आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टार्टअपचे ऑफर लेटर रद्द झाल्याने गोंधळ का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या वेगाने वाढणारी स्टार्टअप कंपनी ग्रॉफर्स चर्चेत आहे. पण चुकीच्या कारणांमुळे. गेल्या वर्षी कंपनीने देशातील टॉपच्या-उच्च महाविद्यालयांमधून भरती केली होती. पण रुजू होण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी आपले ऑफर रद्द केल्या. नाराज विद्यार्थ्यांनी मग न्यायालयात प्रकरण दाखल केले.यावर ग्रॉफर्सचे म्हणणे होते की, विद्यार्थ्याना पाठविलेली पत्रे ऑफर लेटर नव्हे तर इंटेन्ट लेटर होते. कंपनीकडून जॉब कन्फर्म करणे सुरु होते. अशातच मग फ्लिपकार्टसारक्या कंपन्यादेखील पत्र उशिराने देतात.याला जबाबदार कुणाला धरायचे. खरे पाहाता स्टार्टअप कंपन्या ज्या बाजारात संचालित होतात. त्या बाजाराची प्रकृती फारच अस्थिर आहे. स्टार्टअप कंपन्यांच्या फंडीगमध्ये हेरफेर झाल्याचा नव्या भरतीवर फारच प्रतिकुल प्रभाव पडत आहे. विद्यार्थी आणि कंपनीच्या रस्सीखेचीत शेवटी ग्रॉफर्सचीच जीत होईल असे दिसतेय. अनेक कॅम्पसमध्ये अशा प्रकाराने चिंतेचे वातावरण बनले आहे. ज्यामुळे स्टार्टअपच्या भरतीसाठी कडक नियम बनविले आहेत. काहींसाठी तर स्टार्टअप्सवर तर यावर्षी भरतीवर बंदी लावण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. यात दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत.- जॉब देण्यास नकार देणे वा उशिर करणे ही कुठलीही नवी गोष्ट नाही.

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्याही विद्यार्थ्यांना महिनेच नव्हे तर वर्षभर देखील जॉबसाठी वाट पाहायला लावतात. दुसरी गोष्ट- आयआयटी आणि आयआयएम सारखी प्रतिष्टीत महाविद्यालयेदेखील या जॉब कॅन्सलेशनचे बळी झाले आहेत. आतापर्यंत हे दुसऱ्या वा तिसऱ्या श्रेणीच्या महाविद्यालयांबाबत असे होत असे. ते अचानक जॉब देणे रद्द करतात तर त्यावर गडबड गोंधळ कोर्टबाजी करुन काय होणार. शेवटी कधी ना कधी कॉलेज आणि स्टार्टअप यांच्यात समझोता होईलच. कारण प्रश्न दोघांच्या विश्वासार्हतेचा आहे. यापेक्षा मी आयआयटी पदवीधर म्हणून चालून येणाऱ्या जॉबची वाट पाहू नका.

हर्ष गुप्ता,
२२ सहसंस्थापक,क्रेटिफ, आयआयटी गांधीनगर
बातम्या आणखी आहेत...