आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिक रिक्षाचालक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या भ्रष्टाचारी, लुटारू आणि फसवेगिरी करणा जगात प्रामाणिक लोक आहेत म्हणून हे जग चांगले आहे, असे आपण म्हणू शकतो. प्रामाणिक लोकांच्या चांगुलपणाचा मला आलेला हा अनुभव नमूद करत आहे. 9 मार्च रोजी मी व माझी बहीण स्कूटीवरून सातारा परिसरातील घराकडे परत जात होतो. खरेदी आटोपून आम्हाला तातडीने रेल्वेने बंगळुरूला जायचे होते. त्यामुळे घाईघाईने गावातील खरेदी आटोपून घराकडे जात होतो. यादरम्यान रस्त्यात माझी पर्स ज्यामध्ये 13 हजार रुपये रोख रक्कम, चांदीचे पैंजण, महत्त्वाची कागदपत्रे तसेच घराच्या किल्ल्या होत्या, ती पडली. अर्धा रस्ता पार केल्यानंतर पर्स रस्त्यातच कोठेतरी हरवल्याचे लक्षात आले. घराच्या किल्ल्या पर्समध्ये व गाडीची वेळ झालेली... काही सुचतच नव्हते. बरीच शोधाशोध करूनही पर्स न मिळाल्याने आम्ही नातेवाइकाकडे गेलो होतो. त्यांना सर्व परिस्थिती सांगतच होतो, इतक्यात गौतम पारिख नावाच्या एका व्यापाचा फोन आला. त्यांनी फोनवर सांगितले, अशा वर्णनाची पर्स माझ्या दुकानात एका रिक्षावाल्याने आणून दिली आहे. ती तुम्ही घेऊन जावी. आम्ही उस्मानपुतील त्या दुकानात गेलो. तेव्हा पारिख यांनी सांगितले, ‘तुमची पर्स पडल्याचे मागून येणा रिक्षावाल्याच्या लक्षात आले होते. त्यांनी ती पर्स माझ्याकडे आणून दिली. मला शोधाशोध केल्यानंतर त्या पर्समध्ये एक डायरी सापडली. त्या डायरीत माझ्या बाहेरगावी राहणा एका भावाचा क्रमांक होता. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तुम्हाला कळवले असणार!’ आम्ही हकीकत मान्य केली. त्यांचे आणि विशेषत्वाने त्या प्रामाणिक रिक्षाचालकाचे आभार मानले. रोख रक्कम व इतर चीजवस्तू असताना त्याने प्रामाणिकपणा दाखवला! माझ्या पर्समध्ये रोख रक्कम होती. ती कोणासही सापडली असती, तर त्याची नियत फिरली असती. आजकाल प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे.