आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक आलेल्या आव्हानांचा सामना करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही गोष्टी - मग त्या नात्यांसंबंधी असोत की कामकाजासंबंधी - चुकीच्या घडत असतील. त्यांची सोडवणूक करताना काही वेळा अडचणीही निर्माण होतात. अशा आव्हानांना तोंड तर द्यावेच लागते.
'का?' ऐवजी 'काय?' वर लक्ष द्या
१. माझ्याबाबतीतच असे का, हा प्रश्न नंतरही विचारता येतो. आपल्या मेंदूला समस्या सोडवणे आवडते. समस्येवरील सर्वात चांगले निराकरण कोणते असे जेव्हा तुम्ही मेंदूला विचारता तेव्हा यावर लगेच तो व्यावहारिक तोडगा शोधू लागतो.
२. संमोहनाचे टेप ऐका. यामुळे आंतरिक शांती, आनंद किंवा तुम्ही हवी तशी जाणीव करून घेऊ शकता. अशा प्रकारचे टेप २१ दिवसांपर्यंत ऐकायचे असतात. तुमच्या आयुष्यात बदल दिसून येईल.
३. नेहमी तुम्ही अडचणीतून बाहेर येण्यात यशस्वी ठरू शकत नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्यापेक्षाही अधिक जाणकार लोकांकडून मदत किंवा मार्गदर्शन घेण्यास संकोच करू नका. अनेकांना मदत करण्यात आनंदच वाटतो.

हा काळ तात्पुरता असतो
१. येनकेन प्रकारेण तुम्ही या स्थितीतून बाहेर पडाल. प्रत्येक परिस्थितीवर काहीतरी मार्ग निघतोच. मग तोडगा तुम्हाला अनुकूल नसेलही. पण नव्याने सुरुवात करण्यास मोकळे तरी व्हाल.
२. गरजेपेक्षा जास्त बोलण्याने समस्या आणखी अवघड होते. तुमचे भावनेवर नियंत्रण नसल्याने असे घडते. पण नंतर या गोष्टीचा तुम्हाला पश्चात्ताप होतो. शांत राहूनच चांगला निर्णय घ्या.

यापासून मी काय शिकलो? ते आवर्जून पाहा
१. आव्हानात्मक परिस्थितीत नेहमी काही ना काही मौल्यवान बाब असते. आपण प्रत्येक अनुभवातून शिकण्याची सवय जितकी अंगवळणी पडेल तितके तुम्ही आव्हानात्मक अनुभवात संसाधनक्षम व्हाल. आव्हानामुळेच आपला विकास होतो, हे खरे.
२. गरजेपेक्षा जास्त विश्लेषण करत बसू नका. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर गरजेपेक्षा जास्त विचार करता, तेव्हा प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक व्यक्तीचे आकलन करत जाता. यामुळे तुम्ही आव्हाने पेलण्यासाठी योग्य पावले टाकू शकणार नाही. दीर्घकाळात यामुळे निराशा येऊ शकते.
३. जास्तीत जास्त माहिती गोळा करा. अशा परिस्थितीतून गेलेल्या लोकांशी चर्चा करा. अनेक जण या परिस्थितीतून गेलेले आहेत, हे जेव्हा तुम्हाला उमजेल तेव्हा एकटेपणाची भावना नाहीशी होईल. तुम्ही योग्य निर्णय घेण्यास सक्षम व्हाल.