आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्याला हार्वर्डची भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील प्रसिद्ध अशा हार्वर्ड विद्यापीठात शिकणारा निकोलस राथ ‘गार्डन’ या इंग्रजी शब्दाला वेगवेगळ्या भाषेत काय म्हणतात, याची माहिती मला देत होता. ते ऐकताना मला ‘मर्चंट अँड आयव्हरी’ या चित्रपटाची आठवण येत होती. जानेवारी महिन्यातील तो एक दिवस होता. मी अलाहाबादमध्ये गंगा नदीच्या किनार्‍यावर बसून निकोलस राथशी बोलत होते. हिंदीमध्ये जंगलाला ‘उपवन’ किंवा ‘वन’, पर्शियनमध्ये ‘बाग’ किंवा ‘चमन’, तर तुर्कीमध्ये ‘बगिचा’ म्हणतात. हे सगळे शब्द ‘गार्डन’शी निगडित होते. निकोलस राथ हा जंगल आणि बाग यांच्यावर पीएचडी करत आहे. त्याच्या पीएचडी प्रबंधाचे नाव होते ‘व्हर्जिनल फॉरेस्ट अँड द कल्टिव्हेटेड गार्डन’. निकोलस त्याच्या 40 सहकारी विद्यार्थ्यांना भारतात कुंभमेळा पाहण्यासाठी घेऊन आला होता.
कुंभमेळ्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराचा अभ्यास करण्यासाठी हे विदेशी पाहुणे उत्सुक होते. याचा अर्थ अशा अभ्यासातून नेटिव्हांना शिकवण्यासाठी गोरे आले आहेत असे नाही. पण माझ्या मनात शंका होती की, हे पाहुणे अत्यंत प्रदूषित व घाणीचे साम्राज्य असलेल्या गंगा, यमुना आणि गुप्त समजल्या जाणाºया सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमात बुडी मारतील का? पुढे दोनएक दिवसांनी ही मुले डायना एक या प्राध्यापिकेच्या गटात सामील झाली. डायना या भारताविषयी गेली काही दशके अभ्यास करत आहेत. त्या हार्वर्ड विद्यापीठात धर्मविषयक विषयाचे अध्यापन करतात. त्यांनी बनारसच्या संस्कृतीवर एक पुस्तक लिहिले आहे. या मुलांबरोबर असलेले एक प्राध्यापक राहुल मेहरोत्रा यांनी हार्वर्डमध्ये नगररचना या विषयावर बरेच संशोधन केले आहे. राहुल मेहरोत्रा यांनी मुंबईत आर्किटेक्चरची पदवीही घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी कुंभमेळ्याला भेट दिली होती. या सर्वांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने जमणाºया लाखो लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचा होता. त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या निमित्ताने अलाहाबाद शहरामध्ये राज्य सरकारकडून होणारे गर्दी व्यवस्थापन, दंगल नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था यांच्यावरही अभ्यास करायचा होता.
मला राहुल मेहरोत्रांनी सांगितले, ‘कुंभमेळा हा या पृथ्वीवरील गर्दी करणारा सर्वात मोठा मेळावा म्हणता येईल. यंदा 8 कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. एवढी प्रचंड गर्दी हज यात्रेच्या निमित्ताने मक्का-मदिना येथे किंवा ख्रिसमसच्या दिवशी व्हॅटिकन सिटीमध्येही होत नाही. कुंभमेळा हा दाट नागरी वस्तीच्या व्यवस्थापनाचा एक प्रयोग आहे. हार्वर्ड विद्यापीठ हा मेळा लाखो निर्वासितांच्या छावण्या कशा असतात व त्यांचे व्यवस्थापन कसे केले जाते, त्या नजरेतून पाहते. युद्ध, रोगराई, यादवीमुळे हजारो निर्वासितांचे विस्थापन होत असते. अशा विस्थापितांना एका विशिष्ट भौगोलिक परिसरात दाटीवाटीने जसे राहावे लागते तशी परिस्थिती अलाहाबादमध्ये असते. अलाहाबादचे हे उदाहरण भारतातील दाट नागरी वस्ती असणाºया शहरांनी घेण्यास काहीच हरकत नाही. सरकार आणि विविध आखाडे यांच्या सहकार्यातून स्वच्छता व नागरी व्यवस्थापन उत्तम होऊ शकते, असे मला वाटते. कुंभमेळा आयोजनासाठी अलाहाबाद शहराचे 14 प्रमुख विभाग केले जातात. हिंदू धर्मातील प्रत्येक पंथ, गट त्यांच्या सोयीनुसार या विभागांचे नियंत्रण करतात. जर आपण विविधता आणि सहजीवन मान्य केले तर अशक्य असे काहीच नसते. ’
राहुल मेहरोत्रा यांच्या गटातील विद्यार्थ्यांनी गर्दीचे उंचीवरून दृश्य टिपण्यासाठी एक कॅमेरा पतंगावर लावला होता, पण काही मिनिटांतच कॅमेरा पडला तो शोधण्यासाठी मुले पळाली. अशा घटना घडतच असतात. कुंभमेळ्यातील चार क्रमांकाचा व 13 क्रमांकाचा विभाग मेहरोत्रा यांनी विशेष अभ्यासासाठी निवडला होता. चौथ्या क्रमांकाचा विभाग कुंभमेळ्याच्या केंद्रस्थानी होता. प्रत्येक विभागात एक लहानसे रुग्णालय होते. या रुग्णालयात खोकला, सर्दी, ताप या आजारांवर औषधे दिली जायची. चार बोटींवरची फिरती रुग्णालये संपूर्ण नदीच्या परिसरातील घडणार्‍या अपघातांची नोंद घेत असते. 1954 मध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडून अनेक भाविक मरण पावले होते. त्या पार्श्वभूमीवर गेली कित्येक वर्षे आजार निवारण व अपघातग्रस्तांना विशेष वैद्यकीय मदत मिळण्यासाठी पथके तैनात करण्यात येत आहेत. नुकतीच अलाहाबाद रेल्वेस्थानकातही अशी घटना घडून 30 जण मरण पावले होते, पण या घटनेचा कुंभमेळ्यात होणाºया गर्दी व्यवस्थापनाशी थेट संबंध नाही.
हार्वर्डचा एक गट कुंभमेळ्यातील मलनिस्सारण व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी आला होता. कुंभमेळ्यात नेहमीच्या टॉयलेटबरोबर बायोटॉयलेटचाही वापर सुरू केला आहे. त्याचा अभ्यास ते करत होते. या मेळ्यात लाखो लोक येत असताना त्यांच्या सवयी विविध असतात. या गटासोबत हार्वर्डमध्ये संस्कृतचे अध्यापन करणारे एक माजी प्राध्यापक परिमल पाटील होते. काही विद्यार्थ्यांना तर कुंभमेळ्यात अवैधपणे, परवाना न घेता इतस्तत: बटाटे विकणारे फेरीवाले विरुद्ध कायद्याचे पालन करून परवाने मिळवणारे चहा आणि खाद्यपदार्थ विकणारे फेरीवाले यांचा अभ्यास ‘गेम थेअरी’च्या कक्षेत केला तर त्याचे कोणते निष्कर्ष हाती येतील याबाबत उत्सुकता होती. काही विद्यार्थी प्रत्येक विभागात जाऊन लोकल सेलफोन ऑपरेटरकडून सेलफोन डेटा जमा करत होते. या मेळ्यात लाखो लोकांच्या हातात धर्मग्रंथांबरोबरच मोबाइल फोन होते. तंत्रज्ञानामुळे संपर्क क्रांती किती मोठ्या प्रमाणात पसरली आहे, याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते. या मेळाव्यात गोंधळलेले, भरकटलेले, हरवलेले असे शेकडो स्त्री-पुरुष, मुले-म्हातारे होते त्यांचा ठावठिकाणा, त्यांच्या घरचा पत्ता, मोबाइल फोनच्या निमित्ताने मिळू शकत होता. या कामी कुंभमेळ्यात असलेले मोबाइल आॅपरेटर अत्यंत बहुमोलाची मदत करत होते. कुंभमेळ्यात रोगराई, साथीच्या वार्ता मोबाइल फोनच्या निमित्ताने लोकांना कळत होत्या.
या मेळ्याच्या निमित्ताने प्रथमच चिलीम ओढणारे नागा साधू आणि जुना आखाड्याच्या साध्वींनी त्यांच्या मालकीची जागा भाविकांसाठी दिली होती. याचा कुंभ व्यवस्थापनाला चांगलाच फायदा झाला. जसजसे दिवसांमागून दिवस आणि आठवडे जात गेले तसे जुना आखाडा आणि निर्मोही आखाडा यांच्यातील राजकारण तापत केले, पण त्यांच्यातील तणावाच्या राजकारणाकडे किंवा संघर्षाकडे भारताच्या कानाकोपºयांतून, खेड्यापाड्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी दुर्लक्ष केले. हे लाखो भाविक धार्मिक प्रवचनांचा आस्वाद घेत होते. त्रिवेणी संगमामध्ये स्नान करत होते. सूर्याला अर्घ्य देत होते. निकोलस आणि त्याच्या विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अवर्णनीय आणि वेगळा होता. या सर्वांनी अखेरीस संगमामध्ये डुबकी मारली. कुंभमेळ्याचा अनुभव हा त्यांच्या आयुष्यामधील एक वेगळा अनुभव होता.
(jomalhotra@gmail.com)