आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India born Poet Vijay Seshadri Wins 2014 Pulitzer Prize

कवितेचा यथोचित गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवितेसारख्या अत्यंत अवघड समजल्या जाणार्‍या साहित्यप्रकाराच्या माध्यमातून अभिव्यक्ती करणे एकेकाळी अत्यंत कठीण समजले जायचे. वृत्तांमध्ये बांधलेल्या कवितांचा तो काळ होता. भारताबाहेरही विविध अलंकारांमध्ये बांधल्या गेलेल्या कवितांमध्ये कितीतरी कवींच्या रचना निर्माण होत असत. रुडयार्ड किपलिंग, वडस्वर्थसारख्या पाश्चात्य कवींनी आणि आपल्याकडील केशवसुत, मर्ढेकरांसारख्या कवींनी विषयापासून रचनांपर्यंत कवितेला सामान्यांच्या विचारभावविश्वापर्यंत आणले हा कवितेचा इतिहास सर्वश्रुतच आहे. आज फेसबुकवर चार ओळी रचल्या की झाला कवी इथपर्यंत कवितेचे आपल्याकडे पेव फुटले आहे. अशा ‘गोंधळा’मध्ये अर्थवाही कविता सापडणे ती रचण्यापेक्षा कठीण झाले आहे. कवितेभोवती असे वातावरण निर्माण झाले असताना भारतीय वंशाचे व अमेरिकेत स्थायिक झालेले विजय शेषाद्री यांना त्यांच्या ‘थ्री सेक्शन : पोएम्स’ या कवितासंग्रहासाठी मानाचा समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार यंदा प्राप्त होणे ही कविता या साहित्यप्रकारासाठी नक्कीच आशादायी बाब आहे.

गेल्या दहा वर्षांतील पुलित्झर पुरस्काराची यादी पाहिल्यास दीर्घकाळानंतर भारतीय वंशाच्या कवीला मिळालेला हा पुरस्कार पुन्हा एकदा कवितेचे साहित्यातील महत्त्व अधोरेखित करतो. शेषाद्री यांनी याआधी द लॉँग मिडो, वाइल्ड किंगडम यांसारखे कवितासंग्रह लिहिले आहेत.“First I had three apocalyptic visions, each more terrible than the last. The graves open, and the sea rises to kill us all. Then the doorbell rang, and I went downstairs and signed for two packages.”

‘थ्री सेक्शनमधील धिस मॉर्निंग’ यासारख्या कवितेतल्या या समकालीन भाषा असलेल्या ओळी शेषाद्री यांच्या लेखनातील साहित्यमूल्य स्पष्ट करतात. या पुस्तकाच्या निमित्ताने व या पुरस्काराच्या निमित्ताने सिद्धार्थ मुखर्जी, लेखिका झुंपा लाहिरी, गीता आनंद,
गोविंद बिहारीलाल या चार भारतीय वंशाच्या पुलित्झर पुरस्काराच्या मानकरींमध्ये शेषाद्री यांची मानाची भर तर पडली आहेच शिवाय कवितेचा हा यथोचित गौरव आहे.