आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडद्यामागील: भारतीय क्रिकेटची सूत्रे कुणाच्या हाती?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट संघाचा दारुण पराभव झाल्यानंतर देशात ऊरबडवेगिरीचा सामूहिक कार्यक्रम सुरू आहे. कालपर्यंत गळ्यातील ताईत असलेले क्रिकेटपटू आज टीकेचे धनी बनले आहेत. मूर्ती घडवण्यात आपण अधिक कुशल आहोत की मूíतभंजन करण्यात, हे सांगणे थोडे कठीणच आहे. दोन्ही कामांतील आपली गती एखाद्या वेगवान गोलंदाजालाही मागे टाकू शकते. आपण कोणत्याही क्षेत्रात माणसाला माणूस राहू देत नाही. एक तर आपण देवपण देतो, नाहीतर दानव मानू लागतो. खरे तरी आपली अंधर्शद्धा आणि आपला अंतहीन तिरस्कार आपल्याला कधीच घटना व गोष्टींकडे तटस्थतेने पाहू देत नाही. आपले हात एक तर टाळ्या वाजवतात, नाही तर दगडफेक करतात. आपली वाणीतून कधी कौतुकाचे शब्द निघतात, तर कधी शिव्यांची लाखोली. लाक्षणिक इलाज हे आपले आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपण कधीच मुळावर घाव घालत नाहीत, व्याधींचे परतणे आपणास आवडते. आजारी माणूस बरा झाला तर क्षेमकुशल विचारण्याच्या आनंदापासून वंचित राहू. एका व्यक्तीला दिवसातून तिसर्‍यांदा भेटलो तरी आपण एकच प्रश्न विचारतो, ‘कसे आहात?’ हाच आपला स्वभाव आहे.
असो, लागोपाठच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्या क्रिकेटवर नियामक मंडळाच्या धुरीणांवर कोणीच टीका करत नाही. त्यांच्या हवेल्यांवर कोणीच दगडफेक करत नाही. सर्वांचे हात शिवशिवत आहेत ते खेळाडूंच्या तोंडाला काळे फासण्यासाठी. अनेक दशकांपासून असंख्य लोक म्हणत आहेत की, परदेशात असतात तशा वेगवान आणि उसळी घेणार्‍या खेळपट्टय़ा देशातही बनवायला हव्यात, जेणेकरून देशांतर्गत व बाहेर खेळल्या जाणार्‍या मालिकांत समानता येईल. पचमढी, उटकमंड (उटी), सिमला आणि माउंट अबू या ठिकाणी अशा खेळपट्टय़ा बनवणे काहीच अवघड नाही. असे झाल्यास थंड वातावरणात उसळी घेणार्‍या चेंडूवर खेळण्याचा खेळाडूंना सराव होईल. मात्र, नियामक मंडळाचे धुरीण महानगरातच सामने आयोजित करतात, कारण पैसेवाल्यांची गर्दी गोळा होते. क्रिकेटच्या संरक्षकांना केवळ नगदनारायणाशी देणे-घेणे आहे. जगातील सर्वात र्शीमंत क्रीडा संघटना म्हणून बीसीसीआयचा लौकिक निर्माण झाला आहे, तो याच कारणामुळे. भारतात आता असे एकही क्षेत्र उरले नाही, जेथे घाणेरडे राजकारण होत नाही. जेव्हापासून क्रिकेट हा मोठा व्यवसाय बनला आहे, तेव्हापासून त्याची सूत्रे व्यावसायिक नेत्यांच्या हाती गेली आहेत. भारतीय क्रिकेटची सूत्रे कपिलदेव निखंज, सुनील गावसकर, बिशनसिंग बेदी वा गुंडप्पा विश्वनाथ यापैकी कुणाच्याही हाती नाहीत, यात काहीच आश्चर्य नाही. बीसीसीआयचा पदाधिकारी बनण्यासाठी क्रिकेट सोडून सर्वकाही यायला हवे. खेळ येत असेल तर खेळाच्या बाहेर बसा. कर्नल नायडू, मुश्ताक अली वा पॉली उम्रीगर यांच्या हाती कधी क्रिकेटची सूत्रे होती का? आज आपला खजिना आणि भारतातील क्रिकेटवेडामुळे जागतिक क्रिकेटमध्ये आपली दादागिरी सुरू आहे. क्रिकेट व्यवस्थेत इतके शक्तिशाली लोक आले आहेत की, मुलांच्या परीक्षा, शेतात नांगरणीच्या वेळी बहुतेक शहरे व गावांत वीज नसते; पण आयपीएलच्या असंख्य सामन्यांसाठी कोट्यवधी व्ॉट्स वीज पुरवली जाते. ही बाब जर क्रिकेटवेडाची असती तर सामने सकाळी सात वाजताही खेळवले जाऊ शकतात, मात्र सर्वाधिक धन क्रिकेटच्या टीव्हीवरील प्रसारणातून मिळते. त्यामुळेच सामन्यांचे आयोजन टीव्हीच्या प्राइम टाइम स्लॉटमध्ये केले जाते. जाहिरातदारास मोठा टीआरपी दाखवला तरच तो पैसे लावतो. शीतपेय बनवणार्‍यांच्या विक्रीसाठी भरउन्हाळ्यातही क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
(jpchoukse@bhaskarnet.com)