आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलचा भारतीय दिशादर्शक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटच्या विश्वाशी ज्यांचा ज्यांचा संबंध येतो त्यांच्या मुखी गुगल या सर्च इंजिनचे नाव सर्वप्रथम आपसूक येतेच. गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून भारतीय वंशाच्या सुंदर पिचाई यांची झालेली निवड ही आपल्या देशातील गुणवत्तेला पुन्हा एकदा मिळालेली जागतिक दाद आहे. ‘फॉर्च्युन ५००' यादीमध्ये समाविष्ट असलेल्यापैकी सुमारे सहा कंपन्यांच्या सीईओपदी भारतीय वंशाचे गुणवंत याआधीच विराजमान आहेत. त्यामध्ये पेप्सीच्या सीईओ इंद्रा नुई, मास्टरकार्डचे अजय बंगा, सॅनडिस्कचे संजय मल्होत्रा आदींचा समावेश आहे. त्याच मालिकेत आता सुंदर पिचाई यांनी स्थान पटकावले आहे. गुगल कंपनीचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी व्यवस्थापनात मोठा बदल करून ‘अल्फाबेट इंक' नावाने नवी कंपनी स्थापन केली आहे. या नव्या कंपनीच्या छत्राखाली गुगल व गुगलच्या अनेक उपकंपन्या एकत्रित येणार आहेत. लॅरी पेज ‘अल्फाबेट इंक' कंपनीचे सीईओ, तर या कंपनीच्या अध्यक्षपदी सर्जी ब्रिन असतील. गुगल सर्च इंजिनला मिळालेल्या प्रचंड नफ्यातील काही भाग कंपनीच्या संस्थापकांनी अन्य उद्योगांतही गुंतवला होता. त्यामुळे गुगलच्या समभागधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करणेही अावश्यक होते. गुगलसमोर ट्विटर, फेसबुकसारख्या कंपन्यांनीही मोठे आव्हान उभे केले आहे. या साऱ्या गोष्टींचा सामना करण्याच्या दृष्टीने सुंदर पिचाई यांची गुगलच्या सीईओपदी निवड करण्याचा दूरदर्शीपणा व्यवस्थापनाने दाखवला. चेन्नई येथे १९७२ मध्ये जन्मलेल्या सुंदर पिचाई (त्यांचे मूळ नाव पिचाई सुंदरराजन) यांनी खरगपूर येथील आयआयटीमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे पेनसिल्व्हानिया विद्यापीठात त्यांचा उल्लेख सायबर स्कॉलर असा केला जात असे. पिचाई यांनी २००४ मध्ये गुगल कंपनीमध्ये उत्पादन व संशोधन अधिकारी म्हणून प्रवेश केला. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.