आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Information About China's 50 Cities Who Known As Ghost City

चीनमधील ५० शहरे अशा प्रकारे बनली "घोस्ट सिटी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षांपासून चीनमधील काही शहरे घोस्ट सिटी बनली, असे ऐकिवात आहे. पण हे घडले कसे, हा प्रश्न आहे. किती शहरे घोस्ट सिटी बनली, याला असे नावे कसे मिळाले? याचे उत्तर शोधण्यासाठी चीनमधील प्रमुख इंटरनेट कंपनी बाइडूने त्यांच्याकडील ७७ कोटी युजर्स डेटाचा अभ्यास करून ५० शहरे शोधून काढली. ही शहरे घोस्ट सिटी बनली आहेत. त्यांच्या मते, ज्या शहरात एक तृतीयांशहून कमी युजर्स आहेत ती घोस्ट सिटी म्हटली जातात. उत्तर चीनमध्ये याची संख्या जास्त आहे. बाइडूचे मुख्य संशोधक हेशान वू यांनी सांगितले, या घोस्ट सिटी गेल्या दहा वर्षांत तयार झाल्या आहेत. याची प्रमुख कारणे आहेत : घरांची संख्या कमी असणे, रिअल इस्टेटमध्ये बूम आणि ग्रामीण भागातील जमिनी स्वस्त दरात खरेदी करून शहरातील विकासकांना विकण्याचा अधिकार एका कायद्याने मिळाल्याने या शहराचा आकार पाच पटीने वाढला आणि अशी अनेक उपनगरे तयार झाली. वू यांच्या मते, काही परदेशी माध्यमातून या घोस्ट सिटीला चमत्कारिक नावे दिली आहेत. येथे केवळ काँक्रीटच्या भिंती असून शाळा, दवाखान्यांची तसेच स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही, ही मोठी समस्या येथे जाणवते. अशा ठिकाणी राहण्यास कोण येईल? इतकेच नव्हे तर विकासकांनी नव्या निवासी भागात मॅनहॅटन, अॅमस्टरडॅम, सिडनी, लंडन आणि पॅरिससारखी शहरे वसवली. पाहण्यास हे शहर योग्य दिसते, पण सुविधांचे काय?
गुआंगडोंग राज्यातील हुईझू परिसरातील हा परिसर असून आता या भागास घोस्ट टाऊन म्हटले जाते.