आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांड: खरे आरोपी कोण ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठीचे अहमदनगर येथील प्रतिनिधी मिलिंद बेंडाळे यांनी दिनांक १ जून २०१५ रोजी पुन्हा एकदा दलितांची हत्या या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात आपले मत नोंदवत असताना वरील सर्व घटनांपैकी फक्त जवखेडे हत्याकांडात सवर्णाचा सहभाग नव्हता असे लिहिले, सूचित केले आहे. आजच्या घडीला ते अप्रस्तुत वाटते. त्यानिमित्ताने हा पत्रप्रपंच....

जवखेडे येथील हत्याकांड घडल्यानंतर घटनेत ठार झालेले मृत तसेच त्यानंतर त्यांचे नातेवाईक, पोलीस यंत्रणा, सामाजिक खदखद, या सर्वांचा परिपाक जो आहे तो म्हणजे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याच्या नंतर पोलीसांचा प्रयत्न म्हणजे हाताच्या मुठीत पाण्याची चुळ धरण्याचा प्रयत्न करणे होय.
जवखेडे हत्याकांडातील मृताचे आई-वडील व त्यांचे इतर नातेवाईक जगन्नाथ बळवंत जाधव (वय ८० ) आणि‍ त्यांची पत्नी साखराबाई जाधव (वय ७६) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. त्यात स्वत:चे आणि‍ दिलीप, शारदा, अश्विनी यांचेे शपथपत्रही जोडले आहे. याचिकेत असे स्पष्ट नमूद केले की, फिर्यादी प्रशांत दिलीप जाधवने पोलीसांना फिर्याद देतांना आरोपींची नावे सांगितली. ते आरोपी सवर्ण आहेत. फिर्यादीच्या पूर्वीच समाजसेवक नाथा आल्हाट यांनी पोलीस उपअधिक्षक डी.वाय. पाटील यांना फोनवर सर्व हकीकत सांगितलेली आहे. तरीही अगदी एफ.आय.आर नोंदणीपासूनच पोलीस मुद्दामहून वेगळ्याच दिशेने चाललेत.
ज्या घरात घटना घडली, त्या घराला त्वरीत सील केले असते तर बऱ्याच बाबी उघड झाल्या असत्या, परंतु घराचा दरवाजा सताड उघडाच असल्याने वर्तमानपत्रात बातमी वाचून लोकांची प्रचंड वर्दळ घरात वाढली व पुरावे नष्ट झाले. मृताच्या अंत्यसंस्काराच्या वेळी समुदायासमोर पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी स्पष्टपणे सांगितले की, पोलीसांना आरोपी माहीत झालेत. व लवकरच त्यांना पकडले जाईल. असे असतांना फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे एफ,आय.आर पोलीसांनी लिहीलाच नाही. नार्को टेस्ट व इतर टेस्टही अनेकांची केली. त्यात जाधव कुटुंबाच्या सदस्यांना वेगळीच भुलथाप देवून त्यांची संमती पोलीसांनी घेतली. रविंद्रवर पोलीस अधिक्षक गौतम यांनी प्रचंड दबाव आणून सांगितले. जर जाधव कुटुंबातील काहीच नावे न घेतल्यास आम्ही कुटुंबीतील सर्वांनाच अटक करु थोडक्यात काय म्हणजे जवखेडे हत्याकांडीतील बळी गेलेल्या जाधव कुटुंबियातील उर्वरीत सदस्यांनाच बळीचा बकरा बनविले गेले.
तसेच पोलीस अधिकार्ऱ्यांंनी दिलीप जाधव यांची मुलगी अश्विनीला रुपये ३ हजार दिले व पुढे २ लाख देवू म्हणाले त्यांचे म्हणणे असे होते की, जाधव कुटुंबातील या काही लोकांची नावे सांग परंतू दिलीप जाधवने वरील घटनेबाबात पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामुळे मग चौकशी अधिकार्यांनी जाधव कुटुंबाचा छळवाद सुरु केला. रात्री बेरात्री कितीही वाजता जाधव कुटुंबातील स्त्रियांना पोलीस ठाण्यात बोलावू लागले व अश्लील प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. सुमारे ४२ दिवसांनी घटनास्थळ घराची ची झडती झाली. एवढेच नव्हे तर मृतदेह सापडल्यानंतर जाधव सदस्यांनी त्यांना हा मृतदेह बाहेर काढण्याससुध्दा मदत केली. त्यांच्या अंगावरील कपडे जप्त केले. हे सगळे जाधव कुटुंबाचं मॉरल ढासळण्यासाठीच केले आहे. हा पोलीस बनाव खरे आरोपी समोर येवू नये म्हणूनच होता. व शेवटी पोलीसांनी प्रशांत, अशोक, दिलीप जाधव यांना अटक केली. म्हणून याचिकेत गु. रं. नं. ३१६ - २०१४ मध्ये याचिकाकर्त्यांनी सी.बी.आय. मार्फत फेरचौकशी व्हावी आरोपी प्रशांत, दिलीप, अशोक यांना मुक्त करावे, असे नमुद केले आहे.
वरील विवेचनावरुन असे लक्षात येते की, विविध पक्ष संघटना, जनता व इतर नागरीकांमध्ये निर्माण झालेले प्रचंड असंतोष थांबविण्यासाठीच पोलीसांनी जाधव कुटुंबातील सदस्यांना आरोपी केले. प्रश्न असा उपस्थित होतो का, प्रत्येकवेळी पोलीस सांगत होते की, आरोपी आम्हास माहीत आहेत लवकरच त्यांना अटक करु मग सुरुवातीलाच जाधव कुटुंबातील सद्स्यांना अटक का केली नाही. संवर्णातील संशयीतास अटक करुन पोलीस कोठडीत का टाकले नाही. भलेही ते चौकशीअंती दोषी किंवा निर्दोष आहेत हे निष्पन्न झाले असते. व त्या आधारे निर्णय घेता आला असता. परंतू असे काहीही झाले नाही. त्यामुळे जवखेडे हत्याकांडातील आरोपी मृताचे कुटुं बातील सदस्यच आरोपी कशावरुन इतक्या क्रुर पध्दतीने आई, वडील, मुलास मारुन टाकण्यासाठी तसेच कारण लागते. परंतू ते कारणसुध्दा गुलदस्त्यातच आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अहमदनगर जिल्हा दौरा झाल्यानंतर ते नगर हद्द्ीच्या बाहेर पडत नाही तोच पोलीसांनी केलेला हा खटाटोप संशयास्पद आहे. तेव्हा कुणाच्या तरी दबावामुळे पोलीसांनी केलेला हा बनाव आहे. त्यामुळे सदरील हत्याकांडाची सी.बी.आय.तर्फे चौकशीची मागणी रास्त वाटते.
१ समाजसेवक नाथा आल्हाट याने फोनवरुन डी.वाय.एस.पी. पाटील यांना सांगितलेल्या हकीकतीकडे दुर्लक्ष करणे.
२ फिर्यादीने फिर्याद देतेवेळी जे कथन केले आहे, ते एफ.आय.आर.मध्ये नमूद न होणे.
३ हत्याकांड उघडकीस आल्याच्यानंतर जवळपास मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची वाट पाहेपर्यंत पोलीसांनी तेरी भी चूप और मेरी भी चूप,ची भूमिका घेणे.
४ मृताच्या नातेवाईकांनी न्यायालयामध्ये शपथपत्रे दाखल करुन त्यांच्यावर होत असलेल्या पोलीसी अत्याचाराची कैफीयत मांडल्यानंतरही त्यांचं दमन चालूच ठेवणे.
५ निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून प्रचलीत व्यवस्थेमध्ये असलेल्या सी.बी.आय. या यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी केली असता त्यामागणीचीही दखल न घेणे.

हा सर्व मृतांच्या नातेवाईक जाधव कुटुंबियासोबत घडलेला प्रकार लक्षात घेता लेखक मिलींद बेंडाळे यांनी जवखेडा येथील घडलेले हत्याकांड हे सवर्णेतरांनीच घडवून आणले आहे, असे अप्रत्यक्ष सूचित केले ते चूक होय, न्यायालयाचा निर्णय येणेही बाकी आहे असे असतांना तोपर्यंत तरी जवखेडे प्रकरणात सवर्णाचा सहभाग नव्हता हे म्हणणे चूक होय.

{लेखक हे दलीत अत्याचार विरोधी संघर्ष समिती, औरंगाबादचे सचिव आहेत
बातम्या आणखी आहेत...