आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendra Solanki About Finance Product Sale And Commission, Divya Marathi

फायनान्स प्रॉडक्टची विक्री; छुप्या कमिशनचा हव्यास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ देशातच नव्हे, तर जगभरात गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि प्रॉडक्टच्या बदल्यात मिळणाऱ्या कमिशन आणि फीसवरून चर्चा होत आहे. अनेक गुंतवणूकदारांना कमिशनच्या लालसेपोटी चुकीचे प्रॉडक्ट विकले जातात. सल्ला फी घेऊनही असे प्रकार घडत आहेत. यातील फरक जाणून घ्या...
फायनान्शियल सेक्टरमध्ये सध्या फी विरुद्ध कमिशन अशी चर्चा सुरू आहे. छोट्या गुंतवणूकदारांनी याची माहिती अवश्य घ्यावी. कारण हा खर्च त्यांनाच लागतो. एखादे फायनान्शियल प्रॉडक्ट विकल्यानंतर खूप चांगला इन्सेंटिव्ह मिळतो. मध्यमवर्गीय असे प्रॉडक्ट विकणाऱ्यांना चांगले कमिशन देतात. आता सेबीच्या नव्या कायद्यानंतर फी आणि कमिशनची कमाई करणारे सल्लागार या दोघांनाही वेगळे केले. या कारणामुळेच आता चर्चा फी विरुद्ध कमिशन अशी होते आहे. गुंतवणूकदारांनी यातील फरक समजून घ्यावा.

कमिशन छुपे असतात- जर छुप्या शब्दाचा वापर केला तर प्रॉडक्ट विकणाऱ्यास किती फायदा होतो आहे, याची कल्पना गुंतवणूकदारास येणार नाही. विमा याचे चांगले उदाहरण आहे. त्यांना कमिशनमध्ये काही सूटही मिळते; पण एजंट याची माहिती विमेदारास देत नाहीत. स्वत:च त्याचा फायदा उचलतात. फीमध्ये अशा प्रकारचे नुकसान नसते. एक सल्लागार जेव्हा क्लायंटसोबत काम करतो तेव्हा किती फी चालली आहे, याची क्लायंटला कल्पना असते.

चुकीचे फायदे सांगणे- जेव्हा कमिशन खूप मिळत असते तेव्हा गुंतवणूकदारास खूप काळासाठी बांधील ठेवता येत नाही. मग ते विमा प्रॉडक्ट असेल अथवा म्युच्युअल फंड. काही काळ प्रीमियम भरल्यानंतर काही एजंट गायब होतात. गुंतवणूकदारांची अडचण एेकून घेण्यास कोणी तयार होत नाही. उलट जेव्हा तुम्ही सल्लागारास फी देता आणि सल्ला घेता तेव्हा यात छुपे कमिशन नसते.
सेवांचा दर्जा : कमिशन एजंट क्लायंटला दर्जेदार प्रॉडक्टच दाखवतील याची खात्री देता येत नाही. गुंतवणूकदारांची गरज कोणती हे जाणून न घेता प्रॉडक्टची वैशिष्ट्ये सांगितली जातात. ज्यात कमिशन असते त्यात आर्थिक नियोजन होणे शक्य नसते; परंतु जेव्हा फी देऊन कोणी सल्ला घेत असेल तर त्याला सेवा कशी मिळते आहे, यावरच भर अधिक असतो.

म्युच्युअल फंडात डायरेक्ट प्लॅनमध्ये अशा प्रकारची स्थिती असते. यात कोणत्याही प्रकारचे कमिशन नसते. म्हणजे ते कमिशन असलेले प्रॉडक्ट नाही. अशा वेळी काही निवडक सल्लागार ते प्रॉडक्ट घेण्याचा सल्ला देतात. असे सल्लागार फी जरूर घेतात; पण त्यांना कमिशन नसते. कमिशन नसलेले प्रॉडक्ट घेण्याचा सल्ला एजंट कधीच देत नाहीत. कमिशनमुळे गुंतवणूकदाराला जी सेवा अपेक्षित असते त्या सेवेचा दर्जा चांगला राहत नाही. कमिशनमध्ये सूट किंवा त्यापासून मिळणाऱ्या फायद्याच्या माॅडेलमध्ये बहुतांश त्रुटी असतात. ग्राहकांना किंवा गुंतवणूकदारांना या कमिशनची मोजकीच माहिती असते. परंतु त्यांचा फायदा होण्याऐवजी यात नुकसानच जास्त असते, याची त्यांना कल्पना नसते. हाच फरक कमिशन आणि फीमध्ये आहे. त्यामुळे मध्यमवर्गांनी कमीत कमी फीच्या पर्यायावरच विचार करावा. जो फायदा मिळतो तो कमिशन न दिल्याचा असतो. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका तसेच अन्य देशांतही फी आणि कमिशनवरून चर्चा चालू आहे. विकसित देशांत कमिशन घेणाऱ्या सल्लागारावर बंदी आणण्यात येत आहे. लाखो गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेता भारतातही अशी पद्धत सुरू व्हावी यासाठी दबाव वाढतो आहे.

(लेखक फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य आहे.)