आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendra Solanki Article On Financial Planning To Home

जुने विकून नवे घर घेण्यासाठी आर्थिक नियोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले जुने घर विकून नवे घर घेण्याचे नियोजन केले जाते. यात बहुतांश लोक चुकतात. म्हणजे अवाजवी किंमत गृहीत धरली जाते. त्यामुळे इतके पैसे खिशात येतील असा अंदाज असतो. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर इतर खर्च आणि कर यामुळे हा अंदाज चुकतो.
तीन वर्षांपूर्वी राहुलने एक घर विकत घेतले. घरासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूद पुरेशी नसल्याने त्याला छोटे घर घ्यावे लागले. मात्र, आता त्याच्याकडे चांगली नोकरी आहे. तो जुने घर विकून नवे घेऊ इच्छितो. त्याने आपल्या जुन्या घरापेक्षा मोठ्या आकाराचा फ्लॅट विकत घेण्याचे ठरवले. त्यांची नोंदणी केली. जुने घर विकून त्या पैशात तो नवे घर घेणार आहे. मात्र, ठरावीक कालावधीत त्याला जुना फ्लॅट विकावा लागणार आहे.
खूप प्रयत्न करून त्याला एक ग्राहक भेटला. त्याने काही रक्कम आता देऊन नंतर इतर पैसे देण्याचे कबूल केले. दरम्यान, राहुलची जुन्या फ्लॅटची कागदपत्रे गहाळ झाली होती आणि दुसरी प्रत घेण्यासाठी अर्जही केला नव्हता. ठरावीक काळात घर विकले गेले नाही तर मोठ्या घराचा वाढलेला हप्ता भरणेही अवघड होईल, ही चिंता त्याला सतावत होती. अशा प्रकारे त्याला जितकी रक्कम हवी होती तितकी मिळणार तर नव्हती. घर विकताना इतकी रक्कम हाती लागेल, असा अंदाज करणेही चुकीचे आहे. कारण प्रत्यक्षात तसे होत नाही.
कर आकारणी : एखादी मालमत्ता विकल्यानंतर कॅपिटल गेन टॅक्स तर द्यावाच लागतो. यामुळे गुंतवणूकदार नफ्याचा अंदाज लावू शकत नाही. गुंतवणूकदारांकडे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ मालमत्ता असल्यास कॅपिटल गेन टॅक्स द्यावाच लागतो. मात्र, हा कर वाचवता येतो. यासाठी ठरावीक कालावधीत नव्या मालमत्तेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अथवा कॅपिटल गेन बाँड्स खरेदी करावे लागतील. यातही ५० लाखांची मर्यादा आहे. यामुळे कर जाणून घेऊनच निर्णयाप्रत आले पाहिजे.
खर्च : घर विकल्यानंतर आणि घेताना अनेक मार्गाने इतर ठिकाणीही पैसे लागतात. एजंटामार्फत होणारे व्यवहार. यासाठी त्यांना दलाली किंवा कमिशन द्यावे लागते. ऑनलाइन पोर्टल त्यांच्या वेबसाइटवर लिस्टिंगच्या अाधारे पैसे घेतले जातात. एखाद्या वृतपत्रात जाहिरात देण्यासाठी पैसे द्यावे लागतात. मूल्य निर्धारकास पैसे द्यावे लागतात ते वेगळेच. याबरोबरच दुरुस्ती खर्च लागतो. इतरही खर्च बरेच असतात. यासाठी एखादे घर विकत घेताना तुम्ही आधी चेक देत असाल तर हे सर्व खर्च यात मिळवा.

विपणन : थोड्या दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये एका व्यक्तीने दिल्लीतील एका व्यक्तीस घर विकले. यासाठी त्याने ऑनलाइन पोर्टलची मदत घेतली. त्यामुळे घराची योग्य किंमत मिळाली. यात पोर्टलचे शुल्क द्यावे लागते.
कागदपत्रे : घर खरेदी करताना त्याची संपूर्ण कागदपत्रे आहेत की नाही ते पाहून घ्या. घराचा मालकी हक्क पाहावा. वडिलोपार्जित घर असेल किंवा पॉवर आॅफ अॅटर्नीचा वापर होतो आहे का तेही पाहावे लागते. मालमत्ता कर भरला गेला आहे काय? वीज बिल इत्यादीची माहिती असावी लागते. तेव्हाच घर विक्रीचा व्यवहार सुरळीत होऊ शकतो. काही वेळा घर खरेदी करणारा कर्ज घेतो. अशा परिस्थितीत ज्यांची कागदपत्रे पूर्ण असतात त्यांनाच गृहकर्ज विनासायास मिळते.
मूल्यांकन : एक योग्य खरेदीदार मिळण्याआधी घराचे मूल्यांकन योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. यात त्या परिसराचा दर आणि एजंट जो भाव सांगतात त्यातील फरक पाहा. राहुलने कर, खर्च आणि इतर बाजू लक्षात घेऊनच त्याने जुन्या घराचे मूल्यांकन केले आणि नवे घर घेतले. घराच्या किंमतीत सध्याच्या काळात कमी आहेत.
- रिअल इस्टेटमध्ये सध्या मंदी असल्याने आताच नवे घर घेण्याचे ठरवले तर फायदेशीर ठरणार आहे. जुने घर विकून असा सौदा करणे सोयीस्करही ठरते.
लेखक फायनान्शियल प्लॅनिंग ऑफ इंडियाचे सदस्य आहेत.