आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी स्वरांचा बादशहा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रख्यात गायक मेहदी हसन यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे मला जबर धक्का बसला. कोणीतरी माझ्या छातीवर घाव घातल्यासारखे मला वाटले. मेहदी हसन यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका माझ्या संग्रहात आहेत. जेव्हा मला काहीतरी चांगले ऐकण्याची इच्छा होते तेव्हा मी मेहदी हसन ऐकतो. माझ्या सुदैवाने मी मेहदी हसन यांच्या अनेक मैफलींचा साक्षीदार आहे. त्यांच्याशी बोलण्याची अनेक वेळा संधीही मला मिळाली आहे. एकदा मुंबईत ते माझ्या एका मित्राच्या घरी पहाटे तीन वाजेपर्यंत गायले होते. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय मृदू होते. लंडनमधील अल्बर्ट हॉल येथील एका मैफलीत मी त्यांना पहिल्यांदा ऐकले होते. हा हॉल भारतीय आणि पाकिस्तानी रसिकांनी हाउसफुल्ल होता. प्रेक्षकांमध्ये त्या वेळी जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी हजर होत्या. रंगमंचावर येण्याअगोदर मेहदी हसन यांनी गायत्रीदेवी यांना पदस्पर्श केला व गायनाला प्रारंभ केला होता. मेहदी हसन जयपूरचे होते. त्यांची ‘रंजिश ही सही’ ही गझल सर्वोत्तम होती व ती अनेक रसिकांच्या मनात आजही गुंजत आहे. एकदा स्टुडिओकडे बसमधून जात असताना बसला अपघात होऊन ते जखमी झाले होते. पण तरीही त्यांचा रियाज सुरूच होता. त्यांचा गझल गायकीमध्ये जरी दबदबा असला तरी शास्त्रीय संगीतातील अनेक राग आणि ठुमरीशी त्यांचा दोस्ताना होता. ‘नदिया किनारे मेरा गांव’ हे गाणे मला त्यांच्या गायकीतील सर्वोत्तम गाणे वाटते. आपल्याकडे आकाशवाणीने त्यांना अधिक महत्त्व दिले नाही व त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. त्या काळी आकाशवाणीची निवेदिका चीनच्या डॉ. सन न्येत सेनवर अधिक बोलत असे. आकाशवाणीच्या उर्दू सेवेमध्येही मेहदी अभावानेच ऐकायला मिळत.
काटकसरीचे पर्व
राजीव गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची पानभर जाहिरात
निमित्त त्यांच्या जन्मतिथीचं
बोजा देशाच्या तिजोरीवर
हे खरोखरीच काटकसरीचे मार्ग आहेत?
सध्याची आर्थिक परिस्थिती तर चिंताजनक
अशा वेळी जाहिराती देण्याची गरज आहे ?
लग्नाच्या मांडवात सहा हजारांची उपस्थिती
लग्न एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलांचं किंवा उद्योगपतीचं
सकाळपासून रटरट शिजणारं जेवण
घाई तर एखादं युद्ध पेटल्यासारखी
काटकसरीच्या काळात दिसणारं हे चित्र.
शहराचा श्वास गुदमरून टाकणारी हजारो वाहनं
तर दुसरीकडे फार्महाउसवर रंगणा-या लेट नाइट पार्ट्या
आरशातून दिसते ती देशातील काळजीजन्य परिस्थिती
तर दुसरीकडे दिसते ही मौजमजा
गरिबीच्या गर्तेत अडकलेले लाखो जण
तर लाखांच्या घरात पगार घेणारे बिझनेस एक्झिक्युटिव्ह
काटकसर व कपात करा, असे सांगणारे नेते
पण त्यांच्याकडे आहेत उंची सँडल्स व ज्वेलरी
झगमगत्या दुनियेतील आणखी हे एक चित्र
जयललिता आणि मायावतीच्या रूपानं
(सौजन्य : कुलदीप सलील, दिल्ली)
‘मी माझ्या मैत्रिणीवर फार प्रेम करतोय हे मला दाखवायचे होते.’ पण झाले भलतेच. हॉस्पिटलच्या बाहेर न्यूज चॅनलवाल्यांची गर्दी जमली होती. प्रत्येक जण मला, ‘काय झाले आणि कसे झाले’, असे विचारत होता. माझ्या मते माझ्याकडून भलताच विनोद झाला होता. त्याची गोष्ट अशी : माझ्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाला तिला एक नेकलेस द्यायचा होता. त्या उद्देशाने मी तो विकत घेतला होता. पण तिची जरा गंमत करण्याच्या हेतूने मी तो नेकलेस एका केकमध्ये लपवून ठेवला. पण झालं भलतंच. वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा मी तिला केक दिला व काही सांगणार इतक्यात तिने तो मटकावला. मग मला नेकलेसची कहाणी तिला सांगावी लागली. पोटातील तो नेकलेस काढण्यासाठी तिची रवानगी हॉस्पिटलमध्ये करावी लागली. इंडोस्कोपीच्या साहाय्याने तिच्या पोटातील नेकलेस काढून घ्यावा लागला. आता झालेल्या गोष्टीबद्दल मला पश्चात्ताप करावा लागतोय. मी अनेक तास हा नेकलेस स्वच्छ करण्यात वेळ घालवला. पण मला असं नाही वाटत की माझ्या गर्लफ्रेंडला तो नेकलेस घालण्याची इच्छा होईल !
(सौजन्य : आय, लंडन)
होमोसेक्युशल
संता : प्रितो मैं होमोसेक्युशल हूं
प्रितो : आपको कैसे पता चला ?
संता : मैं सिर्फ होम में ही सेक्स करता हूं.
प्रितो : शुक्र है रब दा, मैं होमोसेक्युशल नही हूं !!!
स्त्रीधनासाठी संज्ञा
एका लेडीज टेलरने बायकांच्या उरोज, कंबर, नितंब यांच्या मापांसाठी काय संज्ञा ठेवली होती?
उत्तर : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश.
(सौजन्य : के. एस. अहलुवालिया, अमृतसर)