आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...असा उपद्रव माजवणाऱ्यांविरुद्ध एकत्र या!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी दिल्लीत एक उर्दू गझल व शायरीचा  ‘जश्न - ए- रेख्ता’ हा कार्यक्रम पार पडला.  कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी पाकिस्तानवंशीय लेखक आणि पत्रकार तारिक फतेह यांना कट्टरपंथीयांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे त्यांना कार्यक्रम सोडून जावे लागले. त्याआधी जयपूरमध्येही लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्याबाबत अशीच घटना घडली. त्यामुळे तस्लिमा नसरीन यांना पुन्हा बोलवलं जाणार नाही, असं आश्वासन  आयोजकांना द्यावं लागलं. कट्टरपंथीय तसेच उपद्रवी लोक अनेकदा विशिष्ट लेखकांच्या पुस्तकांच्या प्रती जाळतात.  
 
इंदूरमध्ये झालेल्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये तारिक फतेह यांना ऐकण्यासाठी खूप गर्दी झाली होती. मुस्लिम संप्रदायात आधुनिक विचारसरणीचे लेखक अशी त्यांची ओळख आहे.  ‘लज्जा’ तसेच ‘फ्रांसीसी प्रेमी’सारख्या आधुनिक तसेच नव्या विचारधारेच्या कादंबऱ्यांसाठी तस्लिमा नसरीन लोकप्रिय आहेत. आजच्या काळात भाषा, साहित्य कलेबाबत उदासीनता वाढत असताना अशा प्रकारचे कार्यक्रम नवी आशा निर्माण करतात. मात्र त्यातही कट्टरपंथीयांनी घातलेल्या गोंधळामुळे लेखक आणि कलाकारांचे मनोबल खच्ची होते. परिणामी ते सार्वजनिक व्यासपीठांपासून दूर राहतात.
 
एखाद्या कलाकृतीबाबत कुणाला आक्षेप असल्यास त्यांनी विरोधाचे वैध मार्ग वापरले पाहिजेत. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी एखाद्याला आपले विचार व्यक्त करण्यापासून रोखणे चुकीचे आहे. जागरूक श्रोता आणि कलाप्रेमींसोबत आपणही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सार्वजनिक ठिकाणी असा उपद्रव माजवणाऱ्यांविरुद्ध एकत्र येऊन संबंधित लेखक अथवा कलाकाराच्या बाजूने ठामपणे उभे राहता येऊ शकते. अशा वेळी तुरळक उपद्रवी लोक आपल्या एकजुटीपुढे फार काळ तग धरणार नाहीत.
  
पीएचडी स्कॉलर, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठ, वर्धा, महाराष्ट्र
बातम्या आणखी आहेत...