आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर आली धावून!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणसह विदर्भात पूर्वाने दमदार हजेरी लावली. उस्मानाबाद, लातूर, बीड, हिंगोलीत तर अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळाला. उमरग्यातील २०० हेक्टरवरील पिके वाहून जाताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात ओला दुष्काळ साठला. साधारणपणे पावणेतीन महनि्यांच्या सरासरीइतका पाऊस अवघ्या १० दविसांत झाल्याने दुबार पेरणीच्या सावटाने शेतकऱ्यांचे हिरमुसलेले चेहरे आता उजळलेत. या पावसाने खरिपातील विशेषत: तूर आणि सोयाबीनला संजीवनी तर मिळालीच, परंतु रब्बीविषयीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
एकीकडे पूर्वाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देतानाच दुसऱ्या बाजूला सरकारी धोरणाचे वाभाडे काढण्यात कुठे कसूर ठेवली नाही हेदेखील या निमित्ताने दिसून आले. ‘आधी पुनर्वसन, नंतर धरण’ हे सरकारी धोरणच आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील अप्पर कुंडलिका प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील रुई पिंपळ्याला पुराचा वेढा तर पडलाच, गावामध्ये पाणी शिरल्यामुळे २५० गावकऱ्यांना बिऱ्हाड हलवणे अपरहिार्य ठरले. भांगेवस्तीचा तर संपर्क तुटला आहे. ज्या प्रकल्पासाठी गावकऱ्यांनी आपली जमीन, घरे दिली. त्यांना मावेजा अजूनपर्यंत मिळाला नाही. जो नविारा सरकारी यंत्रणेने उपलब्ध करून दिला तोदेखील धोकादायक; शविाय वीज, पाणी, रस्त्यांचा तिथे काही मागमूस नाही. नगरजवळच्या नागापूरमधील अनेक कारखान्यांत पाणी शिरले. त्यामुळे दैनंदनि कामकाज रखडले.

हिंगोलीतील कयाधूच्या काठची २१ गावे धोक्यात आहेत. ही काही उदाहरणे ठरावीत. मराठवाड्यासाठी समाधानाची बाब अशी की, नगर आणि नाशिक जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा २४ टक्के झाला. मात्र विदर्भात ‘धान’ अधिक मुबलक येण्यासाठी चांगल्या बरसातीची गरज आहे. ऐन नविडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने मदत आणि ज्या सवलती जाहीर केल्या त्याचा प्रत्यक्ष लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला हा संशोधनाचा विषय आहे. मुळात पहिला पेरा ज्या शेतकऱ्यांच्या हातचा गेला आहे, त्यांच्या झोळीत राज्य सरकारकडून काही ‘दान’ पडलेच नाही. मात्र ते पूर्वाने दिले.