आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या वयोमानामुळे मनात घबराट पसरली असेल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एके दिवशी आरशात न्याहाळत असताना पांढरे झालेले केस आणि चेहऱ्यावर वाढत्या सुरकुत्या दिसून येतात. शरीराची चपळाई पूर्वीसारखी नसते. त्यामुळे मनात उगाच घबराट आणि शंकेचे काहूर उठते...

स्वत:लाच दिवसभरात हजारो मेमो देणे बंद करा
१.बहुतांश वेळ आपण आपल्याशीच बडबडत असतो. दिवसात आपल्या चिंता सतत सतावत असतात. आपले शरीर हे संवाद ऐकत असते. त्याची नोंद ठेवत असते. या बडबडीमुळे नर्व्हस सिस्टिममध्ये विष पसरवणे थांबवा. स्वत:ला प्रतिष्ठा द्या.
२.वयोमानानुसार शरीर पोषक तत्त्वे कमी प्रमाणात ग्रहण करते. भरपूर फळे- भाज्या खा. पूरक म्हणून ड जीवनसत्त्व आणि कॅल्शियमचा आहार घ्या. मांसपेशीमध्ये लवचिकपणा कमी होत जातो. हाडाची घनता कमी होते. व्यायामामुळे हे थांबवता येते.
३.अमेरिकेतील विनोदी साहित्यिक मार्क ट्वेन यांनी म्हटले होते : जशी आपल्या मनाची अवस्था असेल तसेच शरीर असेल. तुमच्या मनाला सक्रिय ठेवायचे असेल तर मेंदूची क्षमता कमी होण्यापासून थांबवू शकाल. शारीरिक बदलाची गतीही कमी करू शकाल.
घनिष्ठ संबंध विकसित करा
१.आयुष्यात कमीत कमी एका महत्त्वाच्या व्यक्तीशी जवळीक ठेवा. त्याच्या नियमित संपर्कात राहा. सुख-दु:खात सहभागी व्हा. त्यांना तुमच्याबद्दल सहानुभूती वाटू लागेल.
२.जिज्ञासा आणि रचनात्मकता वाढत्या वयातील लोकांनाही तरुणात बदलते. काही नवे जाणून घेणे, नवे शिकणे आणि हसतखेळत राहणे, तरुण मित्र बनवणे, या वयातही उत्साहासारखे वाटते.

कंटाळवाण्या चक्रातून बाहेर पडा
१.आतापर्यंत जे केलेले नाही ते करण्याचा प्रयत्न करा. आता कुकिंग क्लास किंवा नवी भाषा शिकून घ्या. तरुण वयात प्रवासाला जायची इच्छा खूप असते, पण तेव्हा वेळ मिळत नव्हता. आता फिरायला जा. तर नवनव्या गोष्टी करत राहा. तुमचे मन प्रसन्न आणि ताजेतवाने राहील.
२.जसजसे वय वाढत जाते तसे शारीरिक सौंदर्य व स्त्री-पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणारे आकर्षण कमी होत जाते, तेव्हा स्त्री-पुरुषांच्या भूमिका बदलत जातात. पुरुषांना तडजोडी कराव्या लागतात. फटकळपणा येतो, तर महिला आग्रही आणि हट्टी बनतात. वाढत्या मोकळेपणाबरोबरच हे संबंध जीवन परिपूर्ण करणारे असतात.
३.खोलवर आयुष्यातच जास्त ताजेपणा असतो. त्याच त्या आयुष्याच्या कंटाळवाण्या चक्रातून बाहेर पडा. मग मेडिटेशन, प्रार्थना करा किंवा जीवनात दया, करुणा आणि विनम्रता असे भाव येऊ द्या.