आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापेक्षा ‘लिव इन’ला तरुणांची पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन वर्षांपूर्वी जेव्हा डा लिन याने आपल्या प्रेयसीबरोबर राहण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या आईने त्याला हरकत घेतली. कारण लग्नाअगोदर हे दोघे एकत्र राहिल्यास त्यांच्या कुटुंबाचे समाजातील स्थान खालावेल अशी तिची भीती होती. आता पुढील वर्षी दोघे लग्न करणार आहेत हे लग्न झाल्यानंतर िलनच्या आईला हायसे वाटेल. लिनचे आई-वडील नवे घर घेणार आहेत तर लिनच्या प्रेयसीचे कुटुंबीय आपल्या मुलीला कार घेऊन देणार आहेत. चीनमध्ये हजारो कुटुंबांमध्ये लिव्ह इन वरून तणाव दिसत आहे. गंमत म्हणजे चीनमध्ये २००१ पर्यंत मुलगा किंवा मुलीने लग्नाशिवाय एकत्र राहणे हा गुन्हा समजला जात होता. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.
चीनमध्ये सामाजिक स्तरांवर रूढी परंपरांमध्ये वेगाने बदल होत आहेत. १९८० च्या दशकाच्या अगोदर सुमारे एक टक्के जोड्या या लग्नाअगोदर एकत्र राहत होत्या. २०१० ते २०१२ दरम्यान ही आकडेवारी ४० टक्क्यांवर गेली आहे. चीनमधील कुटुंबांचा अभ्यास करणाऱ्या एका अहवालानुसार १९८५ नंतर जन्मास आलेल्या सुमारे ६० टक्के मुलामुलींनी लग्नाअगोदर आपण एकत्र राहिल्याची कबुली दिली आहे.
अन्य देशांमध्ये अविवाहितांबरोबर राहण्याची कारणे ही वेगळी आहेत. उदा. एकटं राहण्याची इच्छा, महिलांना मिळालेले आर्थिक स्वातंत्र्य, उशिरा विवाह किंवा विवाहअगोदर लैंगिक संबंध ठेवू नये या परंपरेला आव्हान देण्यासाठी अनेक जोडपी अशा पद्धतीने राहतात. पण चीनमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल अनेक गैरसमज आहेत. श्रीमंत, विकसित देशात अशा प्रथा सर्वमान्य असल्या तरी चीनमध्ये उच्चशिक्षित युवकांमध्ये लग्नाशिवाय एकत्र राहण्याची प्रबळ इच्छा आहे. प्रिन्सटन विद्यापीठात चिनी समाजाचा अभ्यास करणाऱ्या के यू शाई व के यू जिया यांच्या मते हा बदल चीनच्या समाजातील परिवर्तनाचा प्रकार आहे. अन्य देशांमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्यांचा एकमेव उद्देश लग्न करणे हा नसतो. पण चीनमध्ये तसे नाही येथे लिव्ह इनचा अर्थ लग्न करणे आहे.
बातम्या आणखी आहेत...