आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Elections 2014: OBC V S OBC Analysis By Arunkumar Tripathi

ANALYSIS ओबीसी वि.ओबीसी : नवा सत्तासंघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. राममनोहर लोहियांनी समाजपरिवर्तनाच्या संघर्षाकडे हिंदू विरुद्ध हिंदू म्हणजेच कट्टर हिंदू विरुद्ध उदारमतवादी हिंदू या नजरेतून बघितले होते. याच दृष्टिकोनातून आजच्या राजकीय सत्तासंघर्षाकडे बघितले, तर लक्षात येईल की, 2014 ची निवडणूक मुख्यत: ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी होणार आहे...
लोकसभेच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा आला आहे, तशी एक बाब स्पष्ट होऊ लागली आहे. ती म्हणजे, सोळाव्या लोकसभेत सत्तेची धुरा प्रामुख्याने ओबीसी नेते सांभाळणार आहेत आणि त्यांना निवडून देण्यात देशभरातले ओबीसी मतदार निर्णायक भूमिका बजावणार आहेत. ज्यांनी लोकशाही संकेत मोडत, प्रत्यक्ष निवडून येण्याआधीच पंतप्रधानपदावर जाहीरपणे दावेदारी सांगितली आहे, ते नरेंद्र मोदी, घांची(तेली) जातीचे प्रतिनिधित्व करत आहेत. मोदींना समर्थन देण्यासाठी ओबीसी समाजातील अनेक नेते, भाजपला सामील होऊ लागले आहेत. परंतु समजा मोदींना अपेक्षित यश नाही मिळाले, बिगर एनडीए, बिगर यूपीए तिसरी आघाडी सत्तेवर आली, तरीही त्या सरकारचे नेतृत्व ओबीसी नेत्यांच्या हातीच जाणार हे एव्हाना पुरेसे स्पष्ट झाले आहे.
डॉ. राममनोहर लोहियांनी समाजपरिवर्तनाच्या संघर्षाकडे हिंदू विरुद्ध हिंदू म्हणजेच, कट्टर हिंदू विरुद्ध उदारमतवादी हिंदू या नजरेतून बघितले होते. यात त्यांच्या मते, एका गटात उच्चवर्णीय आणि त्यांना सोबत करणारे कट्टरपंथीय होते, तर दुसर्‍या गटात दलित, महिला आणि आदिवासी होते. याच दृष्टिकोनातून आजच्या राजकीय सत्तासंघर्षाकडे बघितले, तर लक्षात येईल की, 2014ची निवडणूक मुख्यत: ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी होणार आहे. यात कुतूहल निर्माण करणारा एक प्रश्न असा आहे की, येत्या लोकसभा निवडणुकीत हा ओबीसी मतदार नेमका कुणाच्या पाठीशी उभा राहणार? दुसरा प्रश्न म्हणजे, मोदींची साथ देण्यासाठी एकत्र आलेले देशातले तमाम ओबीसी नेते, मोदींच्या प्रभावाखाली येऊन विकासाचा बुरखा पांघरून हिंदुत्ववाद्यांच्या गटात सामील होणार का? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, काँग्रेस (25 टक्के) आणि इतर प्रादेशिक पक्षांमध्ये (50 टक्के) विभागली जाणारी ओबीसी मतांची टक्केवारी या वेळी आमूलाग्र बदलणार का?

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, उत्तर प्रदेशातील ओबीसी राजकारण