आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Different Things Happen In Last Week

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागोवा महाराष्ट्राचा: सांस्कृतिक राजधानी पुन्हा एकदा "लक्ष",राज्याला चौथ्यांदा गृहमंत्रीपद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवडयात संबंध महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले ते राज्याच्या सांस्कृतिक राजधानीने. पुण्यातील स्फोटांची तीव्रता कमी असली तरी, त्याचे परिणाम मोठे होण्याची शक्यता आता सुरक्षा यंत्रणा वर्तवत आहे. बुधवारी १ ऑगस्टला पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रोडवर सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान चार वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाले. बॉम्बशोधक पथकाने तीन बॉम्ब निकामी केले. हे सर्व बॉम्ब कमी तीव्रतेचे होते. बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड्स, देना बँकेसमोर आणि गरवारे ब्रीज या ठिकाणी हे साखळी स्फोट झाले. या स्फोटांमध्ये जीवितहानी झालेली नसली तरी, पुण्यात गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या या स्फोटांनी फेब्रुवारी २०१० ला जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या कटू आठवण ताज्या झाल्या.
बुधवारी झालेल्या स्फोटात दयानंद पाटील हा टेलर जखमी झाला. सुरवातीला त्याच्या भोवतीच तपासाची चक्र फिरत होते. मात्र, अजूनही सुरक्षा यंत्रणेला या स्फोटांचे ठोस कारण आणि ते घडवून आणणा-यांचा सुगावा लागलेला नाही. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अबू जिंदाल नुकताच पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याने पुणे दहशतवाद्यांचे टार्गेट असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे दहशतवाद्यांनी कमी तीव्रतेचे स्फोट घडवून 'ड्राय रन' घेतल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणां व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, १ ऑगस्टलाच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले. या फेरबदलात महत्त्वाचे असलेले गृह खाते राज्यातील काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंना मिळाले.
टोल वसुली आंदोलन आणि मराठीची मुस्कटदाबी
शिवसेना - मनसे पासपास, कॉंग्रेस - राष्ट्रवादी दूरदूर
लैलाचे गूढ उकलले, बाळासाहेब-प्रणवदांची भेट व दारा सिंगची एक्झिट