आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देर आये लेकिन...(दीपक पटवे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य मंत्रिमंडळाच्या आठ वर्षांनंतर झालेल्या बैठकीत घोषणांचा पूर येईल, अशी अपेक्षा होतीच; पण निधीचाही असा महापूर आणला जाईल, असे कोणालाही वाटले नव्हते. जाहीर झालेला सर्वच निधी केवळ मराठवाड्यातच खर्च होणार आहे, असे नाही आणि सर्वच निधी आज नव्याने जाहीर केला आहे असेही नाही. स्मार्ट सिटीसारख्या योजनेच्या निधीचे एक उदाहरण त्यासाठी समोर आहे. त्यामुळे जे काही आकडे समोर आले आहेत, त्याने मराठवाड्याचा आता पश्चिम महाराष्ट्र होईल, असे स्वप्न पाहण्यातही काही अर्थ नाही.

मंत्रिमंडळाने भर दिला आहे तो सिंचन आणि शेतीशी संबंधित योजनांवर. मराठवाड्यात सिंचनाची क्षमताच मुळात कमी आहे. त्यामुळे आहे ती क्षमता पूर्णपणे वापरणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आजचे निर्णय उपयोगी पडणारे आहेत. पण या निर्णयांची अंमलबजावणी कशा प्रकारे होते यावर त्यांचे परिणाम अवलंबून राहतील. काही निर्णयांचे परिणाम दीर्घकाळानंतर दिसायला लागतील. उदाहरणार्थ औद्योगिक विकासाला चालना देणारे क्लस्टर्स, रसायन तंत्रज्ञान संस्थेसारखी संस्था, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने उभारली जाणारी ग्रामीण विकास संस्था यांचे काम सुरू होऊन प्रत्यक्ष परिणाम दिसायला वेळ लागेल. काही निर्णय धोरणात्मक आणि मोठा परिणाम करणारे असले तरी फारसे महत्त्व सर्वसामान्यांना वाटणार नाही, असेही आहेत. कृष्णा-मराठवाडा पाणी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय हा त्यातलाच एक आहे. या संदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला मिळणाऱ्या पाण्याच्या आकड्यांबाबत वस्तुस्थिती सांगून स्वप्नभंग केला असला तरी ते आवश्यकही होते. एकूणच दीर्घकाळानंतर झालेली ही बैठक मराठवाड्यासाठी समाधान देणारी ठरली आहे. ‘देर आये, दुरुस्त आये।’ असे म्हणायला हरकत नाही.
बातम्या आणखी आहेत...