आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबुज : ड्रेनेज योजनेचे लोणी आणि दोन तगडे बोके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली शहराच्या ड्रेनेज योजनेच्या ठेक्यावरून सध्या महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस पक्षातच जुंपली आहे. गेल्या वेळी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या सत्तेत असलेले सुरेश आवटी हे या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनी गेल्या वेळी सत्तेत असताना ड्रेनेज योजनेच्या ठेक्यावरूनच जयंत पाटील यांच्याशी पंगा घेतला होता. सोलापूर महापालिकेने काळ्या यादीत काढलेल्या ठेकेदारालाच यांनी सांगलीच्या ड्रेनेज योजनेचा ठेका दिला होता. त्यामुळे या ठेक्यामागे काय काय घडले असेल, याचा अंदाज येईल. लोकांकडून कर घेऊन ड्रेनेज योजना करायची नाही, असा सध्याच्या सत्ताधारी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांचा आग्रह आहे. नेमका याचा फायदा उठवत ड्रेनेज योजनेचा नव्यानेच ठेका देऊया, असा घाट गटनेते किशोर जामदार यांनी धरला आहे. आता लोकांकडून कर न घेता नवी योजना करायची म्हटल्यावर शासनाकडून निधी उभा करावा लागेल. याची कोणती तरतूद सत्ताधार्‍यांनी केली आहे, हे माहीत नाही; मात्र नव्याने ठेका म्हटल्यावर नव्याने ‘लोण्याचा गोळा’ आलाच. एकाने पहिल्या ठेकेदाराकडून लोणी खाल्ले म्हणून भांडतोय, तर दुसरा लोण्याचा गोळा मिळवण्यासाठी भांडतोय, अशी स्थिती आहे. यात जनतेचे हित किती आहे याच्याशी कोणाला देणेघेणे नाही.