आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगल्या फलनिष्पत्तीसाठी बनवा ‘फ्लेक्सी वर्क प्रोग्राम’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायत्रीला हे वर्ष वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर चांगले गेले. कंपनीच्या कायदेविषयक टीममध्ये तिला वरिष्ठ व्यवस्थापकपदी बढतीही देण्यात आली. दरम्यान घरीच करण्यात आलेल्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये तिला कळले की ती गर्भवती आहे. ती स्त्रीरोगतज्ज्ञाला भेटायला जात असताना तिच्या मनात सतत विचार सुरू होते, पुढचे महिने कसे जातील? तिला स्वत:साठी काही वेळ द्यावा लागेल. भविष्यात काम आणि करिअरचा मेळ कसा घालायचा, यासंबंधी सुपरवायझर शीलासोबत चर्चा करून तिला जाणून घ्यायचे होते.
दुस-या दिवशी शीलाला भेटली तेव्हा तिच्या इतरही शंकांचे निरसन झाले. सर्वप्रथम शीलाने गायत्रीला सांगितले की, ती कंपनीतील टॉप परफॉर्मर आहे. त्यामुळे ही परिस्थिती निभावून नेण्यासाठी कंपनी शक्य ती पावले उचलण्याचा प्रयत्न करेल. कंपनीकडून अशी यंत्रणाही तयार केली जाऊ शकते, ज्यात गायत्रीला काही तासच ऑफिसमध्ये यावे लागेल किंवा आठवड्यातील काही दिवसच ऑफिसमध्ये यावे लागेल. गायत्री ऑफिसमध्ये असताना तिच्या टीममधील सदस्य तिची जास्तीत जास्त मदत घेतील, अशा पद्धतीची योजनाही कंपनी तयार करू शकते. ही व्यवस्था केवळ गर्भवती असतानाच्या काळापुरतीच नाही तर बाळ जन्मल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत राबवता येऊ शकते.
ही योजना प्रत्यक्षात अमलात आणण्यात आली. सुरुवातीला काही अडचणी आल्या. उदा. : सुरुवातीला सहका-यांनी ही योजनाच धुडकावून लावली. केवळ गायत्रीलाच अशी सुविधा का? कंपनी लवचीकतेची व्याप्ती अन्य कर्मचा-यांसाठीही विस्तारणार आहे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. जेव्हा हे सर्व प्रश्न व्यवस्थापनापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी सर्व कर्मचा-यांसाठी ‘फ्लेक्सी वर्क प्रोग्राम’ तयार करण्यावर विचार सुरू आहे, असे सांगितले.
यात टेलिकम्युटिंग, ऑफिसच्या बाहेर असतानाही काम करण्याचे स्वातंत्र्य, घरी राहून काम करण्याचा पर्याय, विनापगारी सुटी, कर्मचा-यांच्या छोट्या मुलांसाठी क्रेच (मुलांसाठी शिक्षण आणि खेळण्यांची व्यवस्था) तयार करणे. सर्वात गमतीची सोय म्हणजे कंपनीने ऑफिसमध्ये स्लीप रूम बांधणे, कर्मचा-यांना वाटले तर ते थोडा वेळ डुलकी घेऊन नंतर कामाला सुरुवात करतील, या सर्व सुविधांचा समावेश आहे.
विक्रम छाछी
कार्यकारी उपाध्यक्ष, डीएचआर इंटरनॅशनल, मुंबई.
vikram.c@ dainikbhaskargroup.com