आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियाच्या विमानाचे गूढ कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी महासागरात (?) बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाइन्स विमानाचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने पाठवलेल्या ‘ब्लूफिन-21’ या विशेष रोबोटिक पाणबुडीलाही या विमानाचे कोणतेच अवशेष सापडले नसल्याने ही मोहीम एकाच दिवसात मागे घेण्यात आली. ‘ब्लूफिन-21’ ही अमेरिकी नौदलाची पाणबुडी असून ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी आहे.

मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या नौदलासोबत या पाणबुडीने साडेसहा तास हिंदी महासागरात विमानाचा शोध घेण्याचे काम केले. या पाणबुडीने सुमारे साडेचार किमी खोलीपर्यंत विमानाचे अवशेष शोधण्याचे प्रयत्न केले व माहितीही शोधयंत्रणेला दिली. पण समुद्राची वाढत जाणारी खोली आणि या पाणबुडीतील तंत्रज्ञानाच्या मर्यादा यामुळे ही मोहीम लगेचच गुंडाळण्यात आली. संध्याकाळी ब्लूफिन-21ने पाठवलेल्या सर्व डेटाबेसचा अभ्यास करण्यात आला पण या डेटाबेसमध्ये बेपत्ता विमानासंंबंधित अशी कोणतीही माहिती मिळाली नाही. आता ही तपासमोहीम हवामान पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा घेतली जाणार आहे. गेल्या महिन्यात मलेशियन एअरलाइन्सचे विमान दक्षिण हिंद महासागरात बुडाले असे मलेशियाच्या सरकारने अधिकृतपणे जाहीर केले होते. या विमानात पाच भारतीय नागरिकांसह चीन, मलेशिया, व्हिएतनाम, सिंगापूर आदीसह 14 देशांचे 239 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी मरण पावल्याचे मलेशियाच्या पंतप्रधानांनी म्हटले होते.

या विमानाचा कसून तपास करण्यासाठी जगभरातील 26 देशांनी प्रयत्न केले. या विमानाच्या बेपत्ता होण्यावरून अनेक वावड्या उठल्या होत्या.

ब्रिटनमधील आघाडीचे वृत्तपत्र ‘डेली मिरर’ ने रशियन गुप्तहेर संस्थांच्या हवाल्याने वृत्त देताना या विमानाचे अपहरण झाल्याचा दावा केला होता. हे अपहृत विमान कंदहारमध्ये असून सर्व प्रवाशांना पाक सीमेजवळच्या बंकर्समध्ये दडवून ठेवण्यात आल्याचे या वृत्तपत्राने म्हटले होते. हे विमान रडारवरून अचानक बेपत्ता झाले तेव्हाच या विमानाचे अपहरण झाले असावे असा संशय व्यक्त करण्यात आला होता. अतिरेक्याचा वाढता धोका लक्षात घेता कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. आता प्रगत तंत्रज्ञानालाही या विमानाचा पत्ता अद्याप न लागल्यामुळे विविध शंकाकुशंका वाढत जात आहेत.