आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुपोषणाविरोधात गंभीर पावले उचलावीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील पालघर आणि मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुपोषण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सरकारी आकडेवारीनुसार कुपोषणामुळे श्योपूरमध्ये २२ तर पालघरमध्ये १३० मुलांचे बळी गेले. आज भारत अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनत असतानाच अनेक राज्यांमध्ये कुपोषणाने गंभीर रूप धारण केले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी २५ लाख मुले कुपोषणाने मृत्युमुखी पडतात. बांगलादेश, इथिओपिया, नेपाळसारख्या जगातील सर्वाधिक कुपोषित देशांच्या रांगेत भारत असल्याचे यावरून दिसते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, बालमृत्युदराबाबत मालदीव , श्रीलंका, चीन या शेजारी राष्ट्रांची भारतापेक्षा चांगली स्थिती आहे. २०१५ मधील जागतिक उपासमार निर्देशांकात धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. उपासमारग्रस्त देशांच्या यादीत भारत पहिल्या २० मध्ये आहे. रॅपिड सर्व्हे ऑफ चिल्ड्रननुसार , पाच वर्षांपेक्षा कमी वयातील ३८.७ टक्के मुलांची वाढ खुंटली आहे. १९.८ टक्के मुले खूप अशक्त आणि ४२.५ टक्के मुलांचे वजन प्रमाणित
वजनापेक्षा कमी आहे.
पालघर आणि श्योपूरमधील कुपोषणाचे वास्तव समोर आल्यानंतरही राज्य सरकार आणि प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. सरकारने ही आकडेवारी गांभीर्याने घेऊन तत्काळ पावले उचलायला हवीत. भारताची पुढील पिढी निरोगी आणि प्रतिभावान घडवण्यासाठी कुपोषणग्रस्त भागात आयसीडीएस, पीडीएस, मनरेगा तसेच मिड डे मिलसारख्या योजनांची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कुपोषणग्रस्त मुलांच्या कुटुंबाला त्वरित पोषण व रोजगार संरक्षण दिले पाहिजे. सरकारने मुलांचे पोषण पुनर्वसन तसेच आरोग्य केंद्रांमध्ये उपयुक्त उपकरणे आणि तज्ज्ञ उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे.
(लेखक हे अॅल्युमनाई, जामिया मिलिया, इस्लामिया, नवी दिल्ली येथे आहेत. )
बातम्या आणखी आहेत...