आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅनेजमेंट फंडा: शिक्षणाचा मिळू शकतो दुहेरी मान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 वर्षांखालील मुलांवर बलात्कार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकरणातील आरोपी मात्र, कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत निदरेष मुक्त होत आहेत. त्याचमुळे काही दिवसांपूर्वी बाल यौन शोषणाच्या घटनांना आळा घालण्यासाठी संसदेत विधेयक पारित करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील नऊ वर्षीय मुलीचे प्रकरण मात्र थोडेसे वेगळे आहे. मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या त्या मुलीचे तिच्या शेजार्‍याने लैंगिक शोषण केले होते. मनोरुग्ण असणार्‍या बालकांच्या जबाबाला न्यायालयीन स्तरावर फारसे महत्त्व नसते; परंतु असे असतानाही या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली व कनिष्ठ तसेच वरिष्ठ स्तरावरील न्यायालयात आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात मनोरुग्णांना शिक्षित करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या 36 वर्षीय पौर्णिमा खाडे यांनी मदत केल्यामुळे आरोपीला शिक्षा होऊ शकली. संबंधित प्रकरण 6 जून 2006 रोजी सुरू झाले. त्या वेळी दहा वर्षांची ती पीडित मुलगी नेहमी आईसोबत असायची. खाडे यांनी न्यायालयाकडून काही अवधी मागितला व त्याप्रमाणे बहुतेक वेळ त्यांनी त्या मुलीसोबत घालवला. न्यायालयातही खाडे यांनी सुरुवातीला त्या मुलीला शाळा, आई-वडील, खेळणी, आईस्क्रीम अशा विषयांवर प्रश्न विचारले. त्यानंतर खाडे यांनी तिला अवघड प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्या वेळी पीडित मुलीने तिच्यावर झालेला अत्याचार न्यायालयात बोलून दाखवला. आरोपीला जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा त्याला पाहून त्या मुलीचा राग अनावर झाला व ती जोर-जोरात ओरडू लागली. त्यानंतर खाडे यांनी न्यायालयासमोर हे सिद्ध केले की, ती मुलगी खोटे बोलत नाही. जानेवारी 2007 मध्ये सेशन कोर्टाने आरोपीला दहा वर्षांची शिक्षा दिली. मुंबई उच्च न्यायालयानेही सेशन कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.
फंडा काय आहे?
शिक्षणाचा उपयोग उदरनिर्वाहासाठी करण्यासह जेव्हा समाजसेवेसाठी करण्यात येतो तेव्हा, त्या शिक्षणाला समाजात दुहेरी मान मिळतो.