आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅनेजमेंट फंडा: कोणीही आपल्या आयुष्यात विनाकारण येत नसते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका लहान बालकाला देवाला भेटायचे होते. त्याचा हा प्रवास मोठा असेल याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्याने त्याच्या बॅगमध्ये चिप्सची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि तो प्रवासाला निघाला. घरापासून काही अंतरावर जाताच त्याची नजर एका आजोबावर गेली. ते बागेमध्ये कबुतरांना पाहत उभे होते. तो मुलगाही त्यांच्याजवळ जाऊन बसला. काही वेळानंतर त्याने पाण्याची बाटली काढण्यासाठी बॅग उघडली. ते आजोबाही उपाशी असतील म्हणून त्याने त्यांनाही काही चिप्स दिले. त्यांनी चिप्स घेत त्या बालकाकडे हसून पाहिले.
बालकाला त्या आजोबांचे हसू अत्यंत चांगले वाटले. त्याला पुन्हा एकदा त्यांना पाहावेसे वाटले म्हणून त्याने पुन्हा पाण्याची बाटली त्यांच्याकडे दिली. त्यांनी पुन्हा त्याच्याकडे तसेच स्मितहास्य करत पाहिले. हे पाहून तो मुलगा अत्यंत आनंदी झाला. त्यानंतर दुपारभर ते दोघे सोबतच बसून होते. तो मुलगा वेळोवेळी त्यांना पाणी आणि चिप्स देत होता. त्या बदल्यात त्याला ते विलोभनीय हास्य मिळत होते. आता संध्याकाळ होऊ लागली होती. त्या बालकालाही थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे त्याला वाटले की, आता घरी जायला हवे. त्यामुळे तो उठला आणि घरी जाऊ लागला. काही अंतर चालल्यानंतर तो थबकला आणि वळून पुन्हा त्या आजोबांकडे आला. त्याने आजोबांना मिठी मारली. त्या मोबदल्यात त्यांनी ओठांवर आणखी मोठे हसू आणत त्याचे आभार मानले.
काही वेळानंतर तो मुलगा घरी पोहोचला. त्याच्या आईने दरवाजा उघडला, तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर हसू पाहून तिने विचारले, ‘आज तू असे काय केले आहे, ज्यामुळे तू एवढा आनंदी आहेस?’ त्यावर बालकाने उत्तर दिले, ‘आज मी देवाबरोबर जेवण केले.’ त्याची आई त्याला काही विचारण्याआधीच तो पुन्हा म्हणाला, ‘आई, तुला माहिती आहे? मी आजपर्यंत त्यांच्यासारखे हसू पाहिले नाही.’ ते आजोबा जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा मुलाने दरवाजा उघडला. वडिलांच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून त्यानेही त्या मुलाच्या आईप्रमाणे त्यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, ‘आज मी देवाबरोबर चिप्स खाल्ले.’ पुढे ते म्हणाले, ‘तुला माहिती आहे? माझ्या मते, देव अगदी लहान वयाचा आहे.’
या गोष्टीचा निष्कर्ष म्हणजे हसल्यामुळे आपले काहीही नुकसान होत नाही. त्याउलट आपण ज्याच्याकडे पाहून हसतो त्याला खूप चांगले वाटत असते. हसू विकत किंवा उधार घेता येत नाही तसेच त्याची चोरीही करता येत नाही. जोपर्यंत आपण कोणासाठी तरी हसत नाही तोपर्यंत त्याचे काही मूल्य नसते. तरीही काही लोक हसण्याला फार अवघड काम समजतात व त्यात कंजुषी करतात. त्यामुळे हसण्याचे महत्त्व लक्षात घेऊन हसायला हवे. कोणी तरी आपल्याकडे पाहून छान हसते आहे. याशिवाय कोणाला अधिक काय हवे असते ? कोणाला पाहून हसल्याने आपल्याला काही नुकसान होत नाही, उलट प्रसन्न आणि समाधानी वाटते.
फंडा काय आहे?
आपण नेहमी हसणे, विनम्र शब्दांचा वापर करणे आणि स्पर्शाला कमी महत्त्व देत असतो. पण या भावनांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्यामागे काही तरी कारण असते. काही लोक थोड्या वेळासाठी येत असतात, तर काही शेवटपर्यंत साथ देतात. आपल्या जीवनात येणार्‍या या सर्व लोकांचे आपल्याला योग्य प्रकारे स्वागत करायला पाहिजे.