आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Management Funda Acting Play A Important Roal In Party

मॅनेजमेंट फंडा - अभिनव कथा पार्टीमध्ये जीव आणतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात रविवारी एका पार्टीमध्ये अभिनव स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रत्येक व्यक्तीला काम करण्याच्या ठिकाणी घडलेली किंवा ऐकलेली मजेदार घटना सांगायची होती. या स्पध्रेत ज्या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले ती याप्रमाणे आहे : 19 व्या शतकात थॉमस अल्वा एडिसनने ग्रामोफोनचा शोध लावला. इलेक्ट्रिक लाइट आणि मोशन पिक्चरसारख्या गॅजेट्सचा शोध लावणार्‍या एडिसन यांना ग्रामोफोनच्या पहिल्या पीसवर प्रतिष्ठित विद्वानाचे आवाज रेकॉर्ड करण्याची इच्छा होती. त्यामुळे 19 व्या शतकातील महान व्यक्तिमत्त्व असलेल्या र्जमनीतील प्रसिद्ध प्राध्यापक मॅक्स मुलर यांची निवड केली.
एडिसन यांनी मुलर यांना पत्र लिहून म्हटले की, ‘मी तुम्हाला भेटून तुमचा आवाज रेकॉर्ड करू इच्छितो. आपण कधी भेटू शकतो याबद्दल कृपया सांगावे.’ मुलर हे एडिसन यांचा खूप सन्मान करत होते. त्यामुळे त्यांनी उत्तरात लिहिले की, एका समारंभासाठी युरोपातील सर्व विद्वान एकत्र येत आहेत. त्या वेळी आपण भेटू.
त्यानुसार एडिसन इंग्लंडला पोहोचले. समारंभात प्रेक्षकांना त्यांचा परिचय करून देण्यात आला. सर्वांनी एडिसन यांचे मन:पूर्वक स्वागत केले. त्यानंतर एडिसन यांच्या विनंतीनुसार मॅक्स मुलर स्टेजवर आले व त्यांच्या उपकरणासमोर काही शब्द उच्चारले. त्यानंतर एडिसन त्यांच्या प्रयोगशाळेत गेले आणि दुपारपर्यंत एक डिस्क घेऊन परत आले. त्यांनी त्यांच्या उपकरणात ग्रामोफोनची डिस्क वाजवली. उपकरणातून मॅक्स मुलर यांचा येणारा आवाज ऐकून उपस्थित लोक एकदम आश्चर्यचकित झाले. या नावीन्यपूर्ण शोधाचे अनेकांनी कौतुक केले. यानंतर मुलर दुसर्‍यांदा स्टेजवर आले आणि उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, ‘मी तुम्हाला सकाळी जे काही सांगितले किंवा दुपारी तुम्ही जे काही ऐकले, ते समजावण्यासाठी मी येथे आलो आहे.’
प्रेक्षकांमध्ये एकदम शांतता पसरली. कारण मुलर जी भाषा बोलत होते ती त्यांना कळत नव्हती. उपस्थित युरोपियन विद्वानांनाही ती भाषा काही उमजली नाही. मॅक्स मुलर त्या वेळी संस्कृत भाषेत बोलत होते आणि ते ऋग्वेदातील पहिले सूक्त म्हणत होते. त्याप्रमाणे ‘अग्निमीळे पुरोहितं’ ही ग्रामोफोन प्लेटवरील पहिली रेकॉर्डिंग होती. मुलर यांनी संस्कृत भाषेची का निवड केली हा सर्वांसमोरील मोठा प्रश्न होता. याबाबत मुलर म्हणाले, ‘वेद हा मानवनिर्मित सर्वात पहिला प्राचीन ग्रंथ आहे आणि अग्निमीळे पुरोहितं हे ऋग्वेदातील पहिले सूक्त आहे.’ अति प्राचीन काळात ज्या वेळी मानव शरीराभोवती काहीही गुंडाळत नव्हता, शिकार करून जीवन जगत होता त्या वेळी हिंदू लोकांनी उच्च नागरी सभ्यता प्राप्त केली होती. त्यांनी वेदाच्या रूपात सार्वभौमिक दर्शन घडवले होते.
आपल्या देशाचा इतिहास अतिशय वैभवशाली असा आहे. ज्या वेळी ‘अग्निमीळे पुरोहितं’चा रिप्ले केला गेला तेव्हा तेथे उपस्थित लोक याच्या सन्मानार्थ उभे राहिले होते. ‘अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवं ऋत्विजं । होतारं रत्नधातमं ।’ सिंधू घाटीतील आर्यांनी ऋग्वेद लिहिला. त्यांनी 1300 ते 1000 इ.स.पूर्व काळात वेद लिहिला होता.
फंडा काय आहे ? या पद्धतीच्या अभिनव कथा पार्टीमध्ये एक प्रकारचा ताजेपणा आणतात. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमातून इव्हेंट चिरकाल स्मरणात राहतो. त्यामुळे पार्टी म्हणजे खाणे-पिणे, नाचणे, गाणे एवढेच नाही हे लक्षात ठेवायला हवे.