आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅनेजमेंट फंडा - अपेक्षा करू नका, सरळ निर्णय घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनमधील हिथ्रो विमानतळावर कस्टम हॉलच्या बाहेर पडल्यानंतर व्हिजिटर्स गॅलरीमध्ये पोहोचून मी नातेवाइकांची प्रतीक्षा करत होतो. त्यावेळी एक व्यक्ती हातात बॅग पकडून माझ्या दिशेने येत होता. तो बरोबर माझ्या बाजूला येऊन थांबला. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय होते. हातातील बॅग जमिनीवर ठेवत त्या व्यक्तीने सहा वर्षाच्या सर्वात लहान मुलाला जवळ घेतले. त्याच्या डोळ्यात डोळे घालून तो मुलाला म्हणाला, ‘तुला पाहून खूप चांगले वाटले. मी तुला मिस केले.’ तो मुलगाही तितकाच भावनिक झाला व म्हणाला ‘डॅडी मलाही तुमची खूप आठवण झाली.’
यानंतर ती व्यक्ती त्याच्या दहा वर्षाच्या मोठय़ा मुलाकडे वळाली व त्याचा चेहरा हातात घेऊन म्हणाला, ‘तू आता खूप मोठा झाला आहेस, तू माझा फार आवडता आहेस, ज्ॉक’ हे सर्व होत असताना त्याची दीड वर्ष वयाची मुलगी आईच्या कडेवरून वडिलांकडे एकटक पाहत होती. त्यावेळी त्याने मुलीचे चुंबन घेत तिला जोरात कवटाळले. त्या मुलीने वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवून शांतपणे त्यांच्याकडे पाहतच राहिली. काही वेळेनंतर त्या व्यक्तीने मुलीला मोठय़ा मुलाकडे सुपूर्द केले व पत्नीकडे पाहून तिला भेटण्यासाठी पुढे आला. पत्नीला जवळ घेऊन त्याने तिचे जबरदस्त चुंबन घेतले. असे दृश्य याअगोदर कधी मी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणावर पाहिले नव्हते. बराच वेळ तो पत्नीच्या डोळ्यात पाहत होता. हळूच तो पत्नीला म्हणाला, ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.’
त्या दोघांना पाहिल्यानंतर नवीन जोडपे एकमेकांना भेटत आहे असे वाटले. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे काहीही नव्हते. हे सर्व घडत असताना पूर्णवेळ मी एकाच ठिकाणी स्तब्ध उभा होतो. त्यावेळी मी स्वत:ला प्रश्न विचारला की, ‘नि:स्वार्थ पती-पत्नीचे प्रेम पाहताना मी यांच्यात इतका का हरवून गेलो?’ काही वेळेपुरते वाटले की, मी कुठली मर्यादा तर ओलांडत नाही ना? त्याचवेळी अनवधानाने मी त्या जोडप्याला एक प्रश्न केला, ‘तुमच्या लग्नाला किती वर्ष पूर्ण झाले’. ते दोघे म्हणाले, ‘आम्ही चौदा वर्षांपासून एकत्र आहोत व आमच्या लग्नाला बारा वर्षे पूर्ण झाली आहेत.’ त्यानंतर मी त्याला म्हणालो, ‘तुम्ही एकमेकांना किती वर्षांनंतर भेटत आहात.’ त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले ‘तब्बल दोन दिवसांनंतर’. त्याचे उत्तर ऐकून मी सुन्न झालो.
त्या दोघांना पाहून असे वाटत की, ते किती महिने किंवा वर्षांनी भेटत आहेत. त्यांच्याबद्दल अधिक विचार न करता मी नातेवाइकांना शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या दांपत्याकडे पाहून मला वाटले की, 24 वर्षांनंतरही माझ्या वैवाहिक जीवनात अशीच भावनात्मकता असावी. त्यावेळी जवळच उभी असलेली ती व्यक्ती माझ्याकडे आली व ‘अपेक्षा करू नका.. निर्णय करा’ असे म्हणत, हसत हसत तेथून निघून गेली.
फंडा काय आहे?
कुठल्याही साधारण गोष्टीला धरून चांगले वाटेल अशी अपेक्षा करू नये. याऐवजी तत्काळ निर्णय घेऊन लहानात लहान गोष्टीचा आनंद लुटा.