आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - वस्तूंचे महत्त्व दुसर्‍यांच्या नजरेनेही पडताळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात मुंबईजवळील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला जाण्याचा योग आला. तेथील पहाडांवर बरीचशी लहाने मुले बागडत होती. थंड हवेच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जमलेली लहान मुले सर्वस्व विसरून खेळत असतात. परंतु प्रत्यक्षात येथे प्रत्येक मुलामध्ये अनुशासन असते. पहाडावर चढताना मागील मुलगा आपल्या पुढच्या मुलावर लक्ष ठेवत असतो आणि पहाड चढण्यासाठी समोरील व्यक्तीला मदत करत असतो. पहाडांवरील लहान लहान गोंष्टीबाबतही एकमेकांमध्ये चर्चा होते. याकडे आपण वयस्कर मंडळी फारसे लक्ष देत नाहीत.
पहाडावर फिरत काही मुलांनी तेथील वस्तूंचा अनमोल खजिना गोळा केला होता. त्या मुलांना वाटत होते की, त्यांच्या आईने ते पाहावे व त्यांचे कौतुक करावे. परंतु त्यांची आई मैत्रिणीशी बोलण्यात मशगुल होती. उत्साहित होऊन त्या मुलांनी दोन-तीनदा आईला म्हटले की, ‘आई पाहा ना आम्ही किती अनमोल गोष्टी जमा केल्या आहेत.’ परंतु तरीही आईने मुलांच्या बोलण्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. मी त्या मुलांसोबत चालत होतो. त्या वेळी मी त्या मुलांना म्हटले की, ‘तुम्ही गोळा केलेल्या अनमोल वस्तूंचा संग्रह मला दाखवू शकता.’ मुले आनंदी झाली आणि त्यांनी जमा केलेला खजिना दाखवण्यास तयार झाले. त्यांचा खजिना पाहता मला एकदम हसू आले. त्
यांच्या खजिन्यात काही रंगीबेरंगी वस्तूंचा संग्रह होता. त्यात फुलपाखराचे तुटलेले पंख, गुलमोहराच्या फुलांच्या पाकळ्या, चमकणारे सुंदर खडे, यूकेलिप्टस झाडाच्या सालीचे तुकडे, आंब्याची पाने, तुटलेली बेल, बंदूक व त्रिशूलच्या आकाराच्या छड्या आणि किंगफिरशचे पंख यांचा समावेश होता. वयस्कर असल्यामुळे मला त्या संग्रहामध्ये काही विशेष वाटले नाही. परंतु मला जाणून घ्यायचे होते की, सहा-सात वर्षांच्या या मुलांना या वस्तूंमध्ये काय विशेष वाटले. त्यामुळे मी त्यांच्या आईची संमती घेऊन जवळपास दहा मिनिटे चर्चा केली.
त्यांच्या मते, संग्रहात असलेला फुलपाखराचा तुटलेला पंख इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे होता, गुलमोहराच्या फुलांच्या पाकळ्या लाल माणकाप्रमाणे चमकत होत्या, चमकणार्‍या खड्यांचा आकार जहाज आणि विमानांप्रमाणे होता, यूकेलिप्टस झाडाची साल चर्मपत्राच्या रोलसारखी होती, छडीचा आकार बंदुकीप्रमाणे होता, किंगफिशर पक्ष्याचे पंख निळ्या रेशमासारखे चमकत होते. त्यांच्याशी बोलून असे वाटले की, पर्यावरणाचा खजिना सगळीकडे आहे. परंतु तो शोधण्यासाठी सहा-सात वर्षांच्या मुलांसारखी नजर असणे गरजेचे आहे.
फंडा काय आहे? कुठल्याही वस्तूबाबत ठोस निर्णय घेताना त्या वस्तूचे महत्त्व समोरील व्यक्तीच्या नजरेतून जाणून घेणे गरजेचे असते. असे केले तरच ती वस्तू सर्वसमावेशक निर्णय प्रक्रियेचा भाग असेल.