आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Management Funda True Love Never Stop From Other

मॅनेजमेंट फंडा - खरे प्रेम कधीही लपू शकत नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित आणि ‘द एलिफंट व्हिस्परर’ सारख्या बेस्टसेलर पुस्तकासह तीन पुस्तकांचे लेखक लॉरेंस अँथोनी (1950-2012) यांनी वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी लढत जगभरातील अनेक हत्तींची अत्याचारापासून मुक्तता केली. तसेच त्यांच्या पुनर्वसनामध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्यावेळी बगदादच्या प्राणिसंग्रहालयातून त्यांनी वाचवलेले हत्ती ही त्यांच्या धाडसाची सीमा होती. 2 मार्च 2012 रोजी त्यांच्या मृत्यूनंतर अचानक दोन म्हातार्‍या हत्तीणींच्या नेतृत्वात काही जंगली हत्ती त्यांच्या घरी पोहोचले होते. ते एकूण 20 हत्ती होते.
आपल्या लाडक्या मित्राला निरोप देण्यासाठी ते 12 किलोमीटरहून चालत आले होते. पण या हत्तींना लॉरेंस यांच्या निधनाची बातमी कशी समजली आणि ते इतक्या लवकर इथपर्यंत कसे पोहोचले याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. लॉरेंन्स यांच्या पत्नी यामुळे फार भावुक झाल्या होत्या. कारण याआधी हे हत्ती वर्षभरापूर्वी तेथे आल्याचे त्यांना माहिती होते. ते दोन दिवस तेथे थांबले. त्यानंतर एक दिवस सकाळी पुन्हा आपल्या घराच्या लांबच्या प्रवासावर ते निघून गेले. या घटनेने मला ‘हाथी मेरे साथी’ या हिंदी चित्रपटाची आठवण करून दिली.
अशाच प्रकारची केरळची एक घटनाही मला आठवते. त्याठिकाणी एका मंदिरातील हत्ती पिसाळला होता (नर हत्तींमध्ये असे प्रकार अनेकदा होत असतात). तसा तो हत्ती खूप शांत होता, पण तशा परिस्थितीत त्याला सांभाळणे अवघड जात होते. रागाच्या भरात त्याने माहुताला सोंडेने उचलून जमिनीवर आपटले. त्यामुळे माहुताचा मृत्यू झाला. पण आपल्या मास्टरचा मृत्यू झाल्याचे पाहून हत्ती विचलित झाला. त्याच्या लक्षात आले की, हे सर्व काही आपल्यामुळेच झाले आहे. त्यामुळे दु:खी झालेला हत्ती अपराधी मनाने त्याच्या मास्टरच्या मृतदेहाच्या शेजारी उभा राहून रडू लागला. तो कोणालाही त्या मृतदेहाजवळ येऊ देत नव्हता. त्याच्या डोळ्यांतून सारखे अर्शू वाहत होते. त्या दु:खामुळे तो हत्ती अनेक दिवस काही खात पितही नव्हता. अखेर डॉक्टरांना त्याला बळजबरीने खाऊ घालावे लागले. त्या हत्तीचे वजन घटू लागले आणि काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला.
पाळीव हत्ती त्यांना पाळणार्‍या आणि त्यांची देखरेख करणार्‍यांबद्दल फार संवेदनशील असतात, हे सर्वपरिचित सत्य आहे. पण पहिल्या गोष्टीप्रमाणे अशी अनेक उदाहरणे सापडतील ज्यामध्ये जंगली हत्तींमध्येही ही भावना असल्याचे स्पष्ट होते. पण जोवर ते माणसांच्या संपर्कात येत नाहीत, तोवर स्वसंरक्षणासाठी ते लांबच राहतात. के बालाकुमारन आपल्या ‘क्रोकोडाइल इन द रिव्हर बँक ’ या तामिळ कादंबरीत सांगतात की, नदीच्या काठावर ऊन खात पडलेल्या मगरी नेहमी आपले तोंड उघडे ठेवत असतात. पक्ष्यांना त्यांच्या दातात फसलेले अन्न खाता यावे म्हणून ते असे करत असतात. त्यांना माहिती असते की, हे पक्षीही आपल्यासाठी चांगले भोजन ठरू शकतात हे माहिती असूनही, ते त्यांना खात नाहीत. त्याचे कारण म्हणजे तसे केल्यास हे पक्षी पुन्हा त्यांचे दात स्वच्छ करणार नाहीत याची त्यांना जाणीव असते. पण या प्राण्यांना समजते ते माणसांना समजत नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारचा फरक करत नाही व जे त्यांचे पोट भरण्यासाठी मदत करतात त्यांचाच जीव घेण्याच्या प्रयत्नात असतात.
फंडा काय आहे?
एखाद्यासाठी असलेले खरे प्रेम लपवता येत नसते. किमान दोघांना या बाबतीत माहिती असते. एक तर जो प्रेम करतो त्याला आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याला हे माहीत असते.