आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - पहिली संधी सोडू नये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खूप जुनी एक कथा आहे. त्यात एक तरुण शेतकर्‍याच्या मुलीशी लग्न करू इच्छितो. ती अतिशय सुंदर असते. लग्नाची मागणी घालण्यासाठी तो शेतकर्‍याच्या घरी पोहोचतो. शेतकरी त्याला खालून वर निरखून पाहतो आणि म्हणतो ‘बेटा त्या मैदानात जाऊन उभा राहा, मी येथून एकामागून एक तीन बैल सोडेन त्यापैकी एकाही बैलाची शेपटी पकडण्यात तू यशस्वी राहिलास तर मी माझ्या मुलीचा तुझ्याशी विवाह करेन.’
तो तरुण मैदानात जाऊन उभा राहतो आणि बैलाची प्रतीक्षा करत असतो. समोरच्या गेटचा दरवाजा उघडण्यात येतो आणि त्यातून एक तगडा मस्तवाल बैल उड्या मारत बाहेर पडतो. त्या वेळी तरुण विचार करतो की, या मस्तवाल बैलाला पकडण्याऐवजी पुढील बैलाला पकडणे योग्य राहील. त्यामुळे तो एका कोपर्‍यात जाऊन लपून बसतो. पहिला बैल असाच निघून जातो. यानंतर पुन्हा एकदा गेटचा दरवाजा उघडतो आणि त्यातून एक महाकाय, रागीट बैल बाहेर येतो. त्या तरुणाने आतापर्यंत जीवनात तसा बैल पाहिलेला नसतो. तो बैल नाकपुड्या फुगवत रागात त्या तरुणाकडे पाहतो. त्याच्या तोंडातून लाळ टपकत असते.
तरुण विचार करतो की, या रागीट बैलाला पकडण्याऐवजी पुढचा बैल कसाही आला तरी त्याला कुठल्याही परिस्थितीत पकडायचे. त्यामुळे तो पुन्हा एकदा लपून बसतो. तिसरा बैल सोडण्यासाठी दरवाजा उघडला की तरुणाच्या चेहर्‍यावर हसू उमटते. कारण तो बैल अतिशय अशक्त आणि साधा असतो. तरुण त्याला पकडण्यासाठी तयार होतो आणि तो बैल जवळ आल्या बरोबर त्याला तत्काळ पकडतो, परंतु त्या बैलाला पकडून काहीही फायदा होत नाही. कारण त्याला शेपूटच नसते.
आता एक नवी कथा घेऊया, एरविन जोसेफ एक सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तो भारतात आधुनिक सायकल विकण्याचे काम करतो. तो ट्विटरचा उपयोगही करतो. ट्विट डेक फीचरवर त्याने लिहिलेल्या शब्दांमुळे त्याला कोणतेही ट्विट येताच याची माहिती मिळते. एखाद्या व्यक्तीला ट्विटरवर तो फॉलो करत नसला तरी याची माहिती त्याला मिळते. त्या शब्दांमुळे त्याला दिवसातून अशा लोकांची माहिती मिळते ज्यांनी ट्विटमध्ये सायकल, सायकल ट्रॅक, सायकलिंग असे शब्द टाइप केले आहेत. अशा लोकांची माहिती मिळाली की एरविन ट्विटरवरील हॅँडलला क्लिक करतो. त्यानंतर ट्विट करणारा व्यक्ती त्याला पुन्हा एकदा मॅसेज पाठवतो. काही क्षणातच तो आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचतो आणि बघता बघता व्यवसायाशी संबंधीत सर्व बाबी स्पष्ट करून डील फायनल होते. सायकल खरेदी करण्याची इच्छा बाळगणारे व्यक्ती ट्विटरच्या माध्यमातून एरविनशी जोडले जात आहेत आणि या माध्यमातून उपलब्ध होणारी पहिली संधी हेरत एरविन आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक पाहता एरविन सायकल खरेदी करणार्‍या व्यक्तीला शोरूमपर्यंत जाऊ देत नाही. जर एखादी व्यक्ती ट्रायल घेण्यासाठी जास्त इच्छुक असेल तर एरविन स्वत: सायकल घेऊन त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचतो. जवळपास 70 टक्के सायकलची विक्री अशाच पद्धतीने केली जाते. एरविन कधीही आलेली पहिली संधी सोडत नाही.
फंडा काय आहे?
- व्यवसायात किंवा खासगी जीवनात मिळालेली पहिली संधी कधीही सोडू नये. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी केवळ विचार न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायला हवी.