आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा- इतरांसमोर सहका-यांना वाईट बोलू नका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनीलला माहीत होते की, त्याचे बॉस पाच दिवस सुट्यांसाठी शहराबाहेर जात आहेत. त्याचे बॉस दुस-या दिवशी पत्नी आणि दोन मुलांबरोबर जाणार होते. सुनीलने बॉसला सुट्यांचे नियोजन करण्यासाठी मदत केली होती. ज्याला रिपोर्टिंग करायची तेच बाहेरगावी जात असल्यामुळे पुढचे काही दिवस कामाचा फारसा तणाव राहणार नाही असे सुनीलला वाटले. दुस-या दिवशी सुनील साडेसात वाजता उठला. आपल्याला उशीर झालाय हे सुनीलला माहिती होते, पण तेवढ्यात आपले बॉस सुटीवर गेले आहेत हे सुनीलला आठवले. सुनीलचा फोन वाजला आणि तो फोन होता त्याच्या बॉसचा.
बॉसने सुनीलला ‘हाय, हॅलो’ म्हणण्याआधीच रागावण्यास सुरुवात केली, ‘तू स्वत:ला काय समजतोस? तू आणि तुझे सहकारी असे कसे करू शकतात ? तुमच्यासारख्या लोकांना काही समजत नाही, तुम्ही कंपनीच्या गरजा कधीही ओळखू शकत नाहीत. ते काहीही असो, मला दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण काम झालेले पाहिजे. तसे झाले नाही तर मला लगेचच राजीनामा मेल कर. मी मोबाइलवर चेक करतो,’ असे म्हणत बॉसने सुनीलचा फोन कापला. असे काही घडू शकते यावर सुनीलला विश्वासच बसत नव्हता. बॉसने त्याला बोलण्याची संधी न देता स्वत:चा निर्णय सांगून फोन कापला होता. सुनीलला अधिक वाईट वाटण्याचे कारण म्हणजे बॉस रागावले तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्यासोबत असल्याचे त्याला माहीत होते. बॉसची पत्नी ही शाळेत सुनीलसोबत होती. सुनील शाळेतील अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्यामुळे अनेक मुलींना तो आवडायचा. सुनीलला आठवले की, शाळेत असताना त्याने बॉसच्या पत्नीला एका प्रोजेक्टमध्ये मदत करायला नकार दिला होता. ऑफिसच्या एका पार्टीमध्ये जेव्हा त्या दोघांची भेट झाली तेव्हा या विषयावर चर्चाही झाली होती. सुनीलने विचार केला की, बॉस रागावलेले पाहून त्यांची पत्नी सुनीलवर जोराजोरात हसली असेल. तसेच शाळेच्या वेळचा बदला घेण्यासाठीच तिने हे केले असावे, असेही त्याला वाटले. असा विचार मनात येताच सुनील लगेचच उठला आणि तयार होऊन ऑफिसला गेला. ऑफिसला पोहोचताच प्रथम त्याने बॉसला राजीनामा पाठवला. त्यानंतर बॉसने फोनवरून सांगितलेले काम त्याने पूर्ण केले. बॉस सुट्यांहून परतण्याआधीच त्याने नोकरीही सोडली होती.
जाण्यापूर्वी त्याने बॉसच्या टेबलवर एक चिठ्ठी ठेवली होती. तिच्यात लिहिले होते की, मी तुमच्या कुटुंबाच्या नजरेस नजर मिळवू शकत नाही. त्याचे कारण तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही परिवारासमोर माझा अपमान केला. त्यानंतर बॉसला त्याची चूक समजली, पण तो काहीही करू शकत नव्हता. त्यामुळे कंपनीने एक चांगला कर्मचारी कायमचा गमावला.
फंडा काय आहे? - तुम्हाला तुमच्या कर्मचा-यावर रागवायचे असेल तर त्याला सर्वांसमोर न रागावणे टाळा. त्यातही ऑफिसमध्ये राजकारण करणा-या कर्मचा-यांसमोर तर कधीही कोणाला रागावू नका. त्यामुळे तुम्ही चांगले नेते बनाल आणि लोकांनाही असे वाटेल की, तुम्ही त्यांच्या आत्मसन्माला महत्त्व देतात.