आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - चैनीच्या वस्तूंकडे आकर्षित होऊ नका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा बाजारपेठेमध्ये चांगली परिस्थिती होती आणि कंपन्या नोक-या देत होत्या, तेव्हा किशोर लुथरिया (नाव बदलले आहे) ने सर्वात आधी एक कार खरेदी केली. त्यानंतर एक मोठ्ठा टीव्ही घेतला. पत्नीच्या मदतीसाठी (जी एका सधन कुटुंबातील होती) एक आचारी आणि गाडीवर एक ड्रायव्हरही ठेवला. तो दुबईत एका आलिशान बंगल्यात राहत होता. त्याजे जीवन अगदी आरामात सुरू होते. 2002 पासून पुढील सहा वर्षे त्याच्यावर देवाची चांगलीच कृपा होती. खरे पाहता त्याची जीवनशैली पाहून इतर अनेक जणांना ईर्ष्या निर्माण होत होती.
त्यातच 2008 मध्ये मंदी आली. सुरुवातीस तर त्याच्या कंपनीने कोणत्याही प्रकारची पदोन्नती देण्यास नकार दिला. त्यानंतर हळूहळू पगार कपात केली जाऊ लागली. अखेर कंपनीही बंद झाली. त्यानंतर कंपनीने कर्मचा-यांना नाममात्र रक्कम देऊ केली. किशोरसमोर असलेली सर्वात गंभीर समस्या म्हणजे त्याची बचत शून्य होती. त्याचप्रमाणे एका जंगलात एक माकड आनंदाने जीवन जगत असते. जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा ते झाडांवरील फळे तोडून खात असे. तसेच थकल्यानंतर झाडांच्या दाट सावलीत ते माकड आराम करायचे. त्याचे जीवन अगदी आरामत सुरू होते. एकदा फिरत फिरत ते माकड एका घरात पोहोचले. त्याला घरात एका टोपलीमध्ये ताजे सफरचंद ठेवलेले दिसले. माकडाने दोन्ही हातात एक एक सफरचंद घेतले आणि ते जंगलाकडे पळून गेले. जंगलात गेल्यावर माकडाने सफरचंद वास घेऊन तपासून पाहिले, पण त्याला ते इतर सफरचंदांपेक्षा वेगळे जाणवले. पण सफरचंद इतके चमकदार होती की, माकडाला मोह आवरत नव्हता. त्याने ते सफरचंद खाण्याचा प्रयत्न केला. पण उलट त्यामुळे त्याच्या दातांना इजा झाली. त्याचे कारण म्हणजे ही फळे मातीपासून बनविलेली होती. ते सफरचंद पाहून जेव्हा इतर माकडे त्याच्याजवळ आली तेव्हा, त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झाली.
सूर्याच्या प्रकाशात चमकणा-या सफरचंदांचा लाल रंग माकडाला आकर्षित करत होता. पण ती खाता येत नसल्यामुळे माकड ती फळे घेऊन दिवसभर फिरत होते. अखेर झाडावर लागलेल्या फळांनी त्याला भूक लागल्याची आठवण करून दिली. पण पुन्हा हातातील त्या फळांनी त्याला झाडावर जाण्यापासून रोखले. त्यामुळे एक अहंकारी पण त्रस्त माकड हातात सफरचंद घेऊन इकडे तिकडे फिरत होते. शेवटी भुकेमुळे माकडाला राहावले नाही. त्याने हातातील सफरचंदांचा मोह सोडला आणि ते जमिनीवर टाकून ते माकड एका झाडावर चढले. त्याने ती फळे जमिनीवर ठेवताच. इतर माकडे त्याच्याबरोबर खेळू लागली. त्यामुळे ती मातीची फळे तुटली. त्यामुळे माकड दु:खी झाले. पण एकूण ते माकड आनंदात होते. कारण ते पुन्हा एका झाडावरून दुस-या झाडावर उड्या मारू लागले होेते व त्याचे जीवन पुन्हा आधीसारखे आनंदी झाले होते. पण असा आनंद किशोरच्या जीवनात परत लवकर आला नाही. कारण आधी त्याच्याबरोबर पार्ट्या करणारे त्याचे मित्र नंतर त्याच्यापासून दूर पळू लागले. अशा परिस्थितीत आर्थिक आणि सामाजिक समस्यांनी त्रस्त झालेल्या किशोर आणि त्याच्या पत्नीने गेल्या महिन्यांत दुबईमध्ये आत्महत्या केली.
फंडा काय आहे? - चैनीच्या गोष्टी मिळवण्यासाठी स्वत:वर फार दबाव टाकू नये. कारण जीवनाची गाडी चालवण्यासाठी त्यांचा उपयोग होत नसतो. चांगले जीवन मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच बचतीचा मार्ग अवलंबावा. त्याचबरोबर अल्पकालीन सुखाचा विचार सोडून व्यापक दृष्टीने सर्व गोष्टींचे नियोजन करावे.