आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकटातून मिळते चांगले काम करण्याची प्रेरणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसुख जगनी याने पाचवीनंतर शिक्षण सोडून दिले, परंतु त्याला मेकॅनिकलशी संबंधित गोष्टींमध्ये अधिक रस होता. 1993 मध्ये गुजरातमधील सौराष्ट्र भागात कोरडा दुष्काळ पडल्याने मोटा देवलिया या गावातील शेतकर्‍यांकडे उदरनिर्वाह चालवण्याइतपत धान्य व पैसे नव्हते.
आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने तसेच चारा व पाणी उपलब्ध नसल्याने जगनी कुटुंबाने त्यांच्याकडील बैलांची जोडी विकण्याचा निर्णय घेतला. अशा वाईट परिस्थितीत जगनीने आपल्या मित्राकडून रॉयल एनफिल्डचे इंजिन विकत घेतले. ऑटोरिक्षाच्या धर्तीवर त्याने नांगरणी करण्यासाठी आधुनिक यंत्राची निर्मिती केली. बैलांच्या तुलनेत पेरणीसाठी या यंत्राचा प्रभावी वापर होत असल्याचा अनुभव तेथील शेतकर्‍यांना आला.

या यंत्राच्या साहाय्याने नांगरणी करताना व्यक्तीची गरज पडत नाही, परंतु बैलांच्या साहाय्याने नांगरणी करताना यंत्राच्या तुलनेत अधिक कष्ट पडत असत. शिवाय बैलांची वेळोवेळी काळजी घेणेही भाग पडत होते. बैलांच्या चारा-पाण्यासाठी 300 ते 500 रुपये खर्च करावा लागत होता. यंत्राच्या आधारे आठ तासांत 15 एकर शेतजमिनीवर नांगरणी केली जात असताना बैलांच्या साहाय्याने अडीच तासांत तीन एकर जमिनीवर नांगरणी होत होती. घरातल्या घरात तयार केलेले यंत्र शेतकर्‍यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. जगनीने या यंत्राला ‘संती’ असे नाव दिले होते. गुजरातीमध्ये ‘संती’ या शब्दाचा अर्थ ‘नांगरणी’ असा होतो. नांगरणीचे अत्याधुनिक यंत्र तयार करण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला असून जवळपास 500 रॉयल एनफिल्डचे ‘संती’मध्ये रूपांतर झाले आहे. जगनीने त्याच्या गावातच एक गॅरेज सुरू केले आहे. जगनीचे पाहून सौराष्ट्रच्या इतर भागांतही अनेक गॅरेजनी असे वाहन तयार केले आहे.
जगनीने शोध लावलेल्या या यंत्राची दखल ‘सोसायटी ऑफ रिसर्च अँड इनिसिएटिव्ह ऑफ सस्टनेबल टेक्नॉलॉजीस अँँड इन्स्टिट्यूशन्स’ने घेतली. जगनीच्या यंत्राला सन 2000 मध्ये नॅशनल इनोव्हेशन्स फाउंडेशन्सद्वारा आयोजित स्पध्रेत दुसरे पारितोषिक मिळाले. ‘संती’सोबत कापणी यंत्र असणारे उपकरण सध्या शेतकर्‍यांना हवे आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. असे उपकरण तयार झाले तर पीक कापणीला मजुरांची आवश्यकता असणार नाही. सध्याचे यांत्रिकीकरण पाहता शारीरिक र्शम कमी कमी होत चालले आहेत. विविध यंत्रांचा शेतीसाठी चांगला फायदा होत आहे. कापणी यंत्राच्या निर्मितीचे र्शेय रॉबर्ट हाल मेक्कॉर्मिकला दिले जाते. या यंत्रांचा 1831 मध्ये शोध लागला. कापणी यंत्राचा शोध लावल्याचा अनेकांनी दावा केला आहे. 1830 च्या दशकात जगभरातील अनेक भागांत याचे पेटंट केले गेले.

फंडा काय आहे? - संकटांमुळे नवनवीन शोध लावण्यासाठी आपणाला प्रेरणा मिळते. जगनीच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्याने नांगरणीचे यंत्र शोधून काढले. ‘दाग अच्छे है’ अशी एका वॉशिंग पावडरची पंचलाइन आहे. याआधारे आपण म्हणू शकतो, ‘जीवनात थोडेबहूत कष्ट चांगले आहेत.’