आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर सवलतीसाठी सर्वप्रथम विम्याचाच योग्य पर्याय निवडावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवदीप कौर या २१ वर्षांच्या आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपये इतके आहे. त्या कुटुंबाच्या खर्चासाठी दरमहा आईवडिलांना २० हजार रुपये देतात. त्यांचा स्वत:चा खर्च वगळता दरवर्षी त्यांची १ लाखांपर्यंत बचत होते. त्यांनी ही रक्कम दीर्घ कालावधीसाठी सुरक्षितपणे ठेवण्यासाठी सल्ला मागितला आहे.

दुसरा किस्सा रणधीर यांचा आहे. २८ वर्षांच्या या तरुणास वर्षाला ६ लाख रुपये मिळतात. त्याच्या आईवडिलांशिवाय इतर ५ व्यक्ती त्याच्यावर अवलंबून आहेत. कुटुंबाचा खर्चाचा सर्व भार उचलूनही त्याच्याकडे बचतीचा मार्गच शिल्लक नाही. त्याला वाटते की, काही बचत झाली तर कोठे तरी गुंतवणूक करावी. त्यामुळे करात सवलत मिळवता यावी. यामुळे पैसे तर वाढीस लागतील. त्याचबरोबर आपले लक्ष्य गाठण्यासाठी सुरक्षाही पाहिजे. गुंतवणुकीसाठी दीड लाखापर्यंतची जास्तीत जास्त मर्यादा असते हे त्याला माहिती आहे. जो पैसा शिल्लक राहतो, त्यापैकी अशी गंुतवणूक करण्याचा तो विचार करेल.

३५ वर्षीय युवक मुकेश यांची वर्षाला १० लाख रुपयांहून अधिक कमाई आहे; परंतु कुटुंबातील काही लोकांच्या आजारपणामुळे आणि त्याला कर्ज घेण्याची वाईट सवय असल्याने (उदा. कार लोन, क्रेडिट कार्ड लोन, पर्सनल लोन) यामुळे तो दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकत नाही.

या तिन्ही गोष्टींत एक समान बाब अशी की, तिघांनीही युलिपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांच्या बँकर्सनी दिला होता. त्यांना सांगण्यात आले की, यानंतर त्यांच्या जीवनात पैशांची साेय चांगली असेल. या तिघांच्या गरजा जवळपास एकसारख्या आहेत. यासाठी कर सवलतीसंबंधी माहिती येथे दिली जात आहे. येथे केवळ रिटर्नच्या बाबतीतच बोलले जात नाही. तर पुढे जाण्याआधी कर वाचवण्यासाठी कोणते पर्याय शिल्लक आहेत.

पब्लिक प्राव्हिडंट फंड (पीपीएफ), इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस), जीवन विमा पाॅलिसीचे हप्ते, नवी पेन्शन योजना, कर्मचारी भविष्य निधी योजना (ईपीएफ), बँकेतील मुदत ठेवी, राष्ट्रीय बचतपत्रे (एनएससी), विमा कंपनीची पेन्शन योजना, म्युच्युअल फंड्स, ज्येष्ठ नागरिक बचत योजना हुडको किंवा नाबार्डचे बाँड आदी घेण्यावर तुम्ही आयकराचे कलम ८० सी अंतर्गत करसवलत मिळू शकते. याशिवाय आणखीही काही खर्च आयकरच्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीसाठी मिळू शकतात. परंतु सध्या तरी आपण ८० सी अंतर्गत येणार्‍या कर सवलतीच्या संदर्भातच येथे माहिती जाणून घेत आहोत.

असे रिटर्न आणि कर
रिटर्न- इक्विटी लिंक्ड प्रॉडक्ट्समध्ये रिटर्न जास्त असतो. जेव्हा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक होते, तेव्हा तो कमी असतो. यात परतावा ठरलेला असतो. तो कमीच मिळतो.
खर्च : जर काही खर्च लागत असेल तर तो फंड मॅनेजमेंट खर्च इत्यादी असतो. त्यात प्रॉडक्ट जास्तीच्या खर्चातही येऊ शकते. ज्यांच्यात खर्च काहीच नसतो तेव्हा कमीच खर्च येतो.
सुरक्षा - गॅरंटेड आणि फिक्स्ड रिटर्नबरोबर सुरक्षित प्रॉडक्ट मिळतात. बाजारातील चढ-उतारावर अवलंबून असतात. त्यांची अंशत: गॅरंटी असते. यात सुरक्षा कमी ते मध्यम अशी असते.
तरलता - यात जितकी करबचत होते, त्यात तरलता कमीच असते.
कर किती- वर दिलेले सर्व प्रॉडक्ट्स उत्पन्न वाचवणारेच आहेत; परंतु त्यात काहींच्या रिटर्नवर कर लागतोच.

पर्याय असे
तुमच्या गरजेनुसार कोणता पर्याय निवडावा हे योग्यप्रकारे ठरवावे लागते. नवदीप, रणधीर किंवा मुकेश या तिघांनाही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची आहे. या तिघांना हाच सल्ला आहे की, आर्थिकदृष्ट्या ते स्वत:वरच अवलंबून आहेत. तरुण आहेत म्हणून त्यांना लवकर पैशांची गरज पडणार नाही. या तिघांनीही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्यावर भर दिला पाहिजे. यात करसवलतीसाठी खालील पर्याय असू शकतात.
१. सुरुवात लाइफ इन्शुरन्स पाॅलिसीने करावी. म्हणजे तुमच्यावर जे अवलंबून असतील ते सुरक्षित असावेत.
२. पीपीएफ चांगला गुंतवणूक पर्याय आहे. कर न लागल्याने लाभ तर मिळतोच आहे; परंतु १५ वर्षांनंतर यात स्रोत करांचा समावेश नाही.
३. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीमपासून सुरक्षित रिटर्न मिळवू शकता.

मणिकरण सिंघल
सेबीचे अधिकृत गुंतवणूक सल्लागार आणि प्लॅनिंग गिल्ड आॅफ इंडियाचे सदस्य
बातम्या आणखी आहेत...