आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikaran Singhavi's Column On Emergency Fund Investment

आपात निधीची गुंतवणूक करू शकता का ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही म्हणाल, आपात निधीसाठी राखून ठेवलेला पैसा गुंतवणुकीसाठी नसतो. हा तुमच्याजवळ असलेला पैसा कधीही उपयोगात येतो. आपात निधी आधी राखून ठेवा, त्यानंतर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करा, असा सल्ला माझ्या जवळच्या एका मित्राला दिला होता.

आपात निधीचा वापर फक्त तत्कालिक परिस्थितीतच करता येतो हे खरे आहे. येथे काही गुंतवणुकीचे मार्ग सांगितले आहेत. यामध्ये आपात निधी गुंतवता येऊ शकतो. यातून बचत खात्यापेक्षाही चांगला परतावा मिळेल.

१. बँक मुदतठेवमध्ये स्वीप इन : आपात निधी केवळ बचत खात्यात ठेवला जातो. हा योग्य परतावा आहे. परंतु यात परतावा कमी मिळतो. घरात लागणारा ६ महिन्यांचा खर्च आपणास आपात निधीसाठी तयार ठेवावा लागतो. यात वाढ करू शकता.

काही कुटुंबांत ही रक्कम १ लाखापासून ५ ते ६ लाख रुपये इतकी असू शकते. बँकेच्या बचत खात्यात यावर ४ टक्के व्याज मिळते आणि मुदती ठेवीवर ८ टक्के व्याज मिळते. म्हणजे मुदत ठेवीच्या तुलनेत बचत खात्यात अर्धाच परतावा मिळतो. ही रक्कम स्वीप मुदत ठेवीत करू शकता का? अशी विचारणा बँकेत करावी. या मुदत ठेवीचा संबंध बचत खात्याशी आहे. या पर्यायात बचत खात्यात ठेवलेली रक्कम बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत काढता येते. त्यानंतर ती मुदत ठेवीत जाते. जेव्हा हा पैसा काढला जातो तेव्हा उरते मुदत ठेव. ती मोडली जाते. तरी त्यावरील व्याजाचा दर कमी होत नाही. अशा प्रकारे तुम्ही बचत खात्यातही पैसे ठेवू शकता आणि मुदत ठेवीच्या व्याजात घटही होणार नाही.

२. बँक मुदत ठेव ओव्हरड्राफ्ट खात्यासह : माझ्या माहितीप्रमाणे स्वीप इन डिपॉझिटची सुविधा सर्व बँका देत नाहीत. यासाठी तुमची बँक अशा प्रकारची सुविधा देत नसेल तर गुंतवणुकीस दुसरा पर्याय उपलब्ध आहे. या सुविधेत मुदत ठेवीवर ८० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. यावर तुम्हाला दीड ते दोन टक्के जास्तीचे व्याज द्यावे लागते. परंतु ही रक्कम खूप कमी कालावधीसाठी वापरात येणारी असावी. यामुळे लिक्विडिटी कायम राहते आणि कुटुंबाची गरज पूर्ण होते. त्यासाठी मुदत ठेव मोडण्याची गरज उरत नाही.

मुदत ठेवीचा दर स्लॅबमध्ये असतो. त्यामुळे तुम्ही मुदत ठेव वर्षभरासाठी ठेवली असेल आणि मध्येच ती मोडली तर तुम्हाला तितक्या कालावधीचेच व्याज मिळते. जर तुम्ही १ वर्षासाठी ८ टक्के व्याजदराने मुदत ठेव ठेवली आणि सहा महिन्यांसाठी ६ टक्के व्याजदर असेल तर ६ महिन्यांत मुदत ठेव मोडल्यास ६ टक्के दरानेच व्याज मिळेल. जितक्या कालावधीसाठी प्रत्यक्षात बँकेत रक्कम जमा राहिली त्या दरानेच व्याज मिळेल. अशा प्रकारची सुविधा ओव्हरड्राफ्ट खाते शक्यतो लवकर बंद केले पाहिजे.

३. लिक्विड म्युच्युअल फंड : लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये आपात निधी ठेवणे चांगला पर्याय आहे. यात अडचणीच्या काळात पैसा काढता येतो. तुमच्या गरजेनुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. पूर्ण रक्कम स्वीप इन मुदत ठेवीत ठेवता येते किंवा लिक्विड म्युच्युअल फंडात ६० टक्के पैसा गुंतवू शकता. जो पर्याय निवडाल त्यात परताव्यापेक्षा अडचणीच्या काळात त्वरित पैसा सहज उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.
वस्तुस्थिती- चालू वर्षात ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंडात ~ १. ५५ कोटी इतकी गुंतवणूक करण्यात आली. यात लिक्विड फंडात ~ १. ०३ लाख कोटी आले.
लेखक हे सेबीचे अधिकृत गुंतवणूक सल्लागार आणि फायनान्शियल गिल्ड आॅफ इंडियाचे सदस्य आहेत.