आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manikiran Singhal About Mutual Fund Investment Management News In Marathi

म्युच्युअल फंडाद्वारे करू शकता जोखमीचे व्यवस्थापन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंतवणूक बाजारात धारणा नेहमी एकसारखी राहत नाही. अनेकदा लोक या धारणेतच अडकून पडतात. कारण त्यांना जोखमीचा अंदाज येत नाही. त्या सेक्टरमध्ये जोखीम कोणती आहे हे जाणून न घेता लोक सहजासहजी पैसे गुंतवतात. प्रत्यक्षात जोखीम माहिती करून घेणे तितके सोपे राहिलेले नाही. कारण बाजारात होत असलेल्या उतार-चढावामुळे तज्ज्ञांनाही अशा प्रकारचे आकलन होत नाही; परंतु शेवटी पैसा लावला आहे तर जाणून घेणे गरजेचे आहे.

रिस्क मॅनेजमेंट साधारणपणे इन्शुरन्स प्लॅनिंगशी संबंधित कल्पना आहे. जर तुम्ही आर्थिक नियोजन करत असाल तर यात पर्सनल फायनान्सच्या सर्व बाजू सामावलेल्या आहेत. यात जीवन आणि आरोग्याच्या जोखमीचाही समावेश हाेतो. यामुळे केवळ जोखमीकडे पाहूनच चालणार नाही. यात अशा अनेक जोखमी असून इन्शुरन्स कंपनीकडे पाठवता येत नाहीत.
यासाठी तुम्हालाच तुमच्या प्लॅनचा आराखडा आखावा लागतो. त्यात म्युच्युअल फंड अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे, ते जर समजून घेऊन वापरात आणले तर अनेक प्रकारच्या जोखमी कमी होऊ शकतात. तरीही कोणत्याही प्रकारची जोखीम नसते, असे होऊ शकत नाही. तरीही तो खालील प्रकारच्या जोखमी कमी करू शकतो.

१. कॉन्संट्रेशन रिस्क : गुंतवणुकीच्या योजनेत कॉन्संट्रेशन रिस्क ही सर्वात गंभीर जोखीम आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही एकाच सेक्टर किंवा अॅसेटमध्ये गुंतवणूक करत असाल. नवे गुंतवणूकदार साधारणत: ताज्या परताव्याच्या अाधारावरच निर्णय घेत असतात. जर एखाद्या शेअरमध्ये चांगला परतावा मिळत असेल तर त्यातच गुंतवणूक करतो. एखाद्या शेअरसंदर्भात त्यांचे काही पूर्वानुमान चुकीचे असू शकेल. त्यामुळे सहजपणे पैसे मिळवणे आणि गतीने फायदा मिळवल्यामुळे ते इकडे आकर्षित होतात. यात रिटर्न चांगले मिळत असल्याने त्यातच पुन्हा पुन्हा गुंतवणूक करणे हितावह असल्याचे त्यांना वाटते.

काही काळानंतर त्यांना वाटू लागते की, या सेक्टरमध्ये आपण जरुरीपेक्षा जास्तीचा पैसा यात गुंतवला आहे. तेव्हा आपली चूक त्यांना समजते. जेव्हा या सेक्टरमध्ये नुकसान होऊ लागते आणि त्यांचा इन्व्हेस्टमेंट फोलिओ तोट्यात दिसून येतो. २००८ मध्ये असाच प्रकार पायाभूत सुविधा क्षेत्रात घडला होता. नंतर २००२ मध्ये आयटी शेअरबाबतही असेच झाले. अनेकांना रियल इस्टेट सर्वकाही असल्याची समजूत असते; परंतु उद्या ते तोट्यात जातील. हीच बाब कन्स्ट्रक्शन रिस्क असते. यातून वाचण्याचा एकच उपाय आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही गुंतवणूक करत चला. त्याचबरोबर अॅसेट अलोकेशन चांगले ठेवा.

डायव्हर्सिफिकेशन : म्युच्युअल फंडात अनेक क्षेत्रांत गुंतवणूक होते. बँकिंग, फार्मा, टेलिकॉम, केमिकल्स इत्यादी. जर सेक्टरवाइज असतील तर यात काही क्षेत्रांत विशेष फंड असतात. ते वेगवेगळ्या शेअर्समध्ये समाविष्ट केलेले असतात. तुम्ही एकच शेअर जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी करू नये, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. शेअर्स नेहमी विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्याने बाजार एकाएकी कोलमडून पडला तर त्याचा परिणाम तुमच्यावर गुंतवणुकीवर होत नाही. कोणता ना कोणता शेअर तुमची गुंतवणूक वाचवतो.

असेट अलोकेशन : कशात किती गुंतवणूक करायची आहे, याचा अचूक अभ्यास जर असेल तर खूप काही समस्यांचे निराकरण आपोआप होते. म्युच्युअल फंडासारखे हायब्रीड फंड एखाद्या अॅसेटमध्ये गुंतवणूक करून तुमची जोखीम वाचवतात. हायब्रीड फंडमध्ये इक्विटी, डेब्ट, गोल्ड इत्यादीमध्ये एकसारख्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. याव्यतिरिक्त तुम्ही व्हॅनिला फंडही खरेदी करू शकता. ज्यात विविध अॅसेटमध्ये गुंतवणूक केली जाते. त्याचबरोबर तुमच्या अॅसेटचे अलोकेशन तुमच्या जोखमीनुसारच असेल हे पाहणे गरजेचे आहे.

२. मार्केट रिस्क : बाजारातील जोखीम समजावण्यासाठी तेजीमध्ये आलेल्या बाजारातील उतार-चढाव समजावणे खूप गरजेचे आहेत. मग तो शेअर बाजार असो किंवा डेब्ट मार्केट, मग तो सोन्याचा बाजारही असेल. हे सर्व बाजार तेजीमुळे उतार-चढाव असलेले मानले जातात. यातील जोखीम पाहता, तुम्हाला यात गुंतवणूक करण्याचा मोह अावरत नाही.

परंतु चांगला परतावा देणारे पोर्टफोलिओ बनवून तुम्ही जोखमीपासून वाचू शकता. म्युच्युअल फंड्स यातही तुम्हाला मदतच करतील. यात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन येतात.

एसआयपी किंवा एसटीपीद्वारा तुम्ही तुमची गुंतवणूक वेगवेगळी करता. अशा प्रकारच्या व्यूहरचनेमुळे तुम्हाला जास्तीचा फायदा यासाठी मिळतो, कारण सर्व प्रॉडक्ट एकदम खराब होत नसतात. काही चांगले चालतात. बाजारात चालणाऱ्या उतार-चढावापेक्षा याच्यावर परिणाम कमी होतो. चलनवाढीचा दर जास्त असल्याने व्याजदर घटतात. दुसरी गोष्ट एसआयपी तुमच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करण्याची संधी देत नाही. अन्यथा तुम्हाला यात नियमितपणे गुंतवणूक करावी लागणार आहे. हे तुमच्या हिताच्या दृष्टीने चांगले असते.
३. चलनवाढ आणि कराची जोखीम: चलनवाढ आणि कराला इन्व्हेस्टमेंट बॉस्केटला २ छेदाच्या रूपात मानले जाते. जे काही सुरक्षित प्रतिफळ मिळाले ते या जोखमीला भेट म्हणून समजावे. सुरक्षित परतावा बँकेची मुदत ठेव किंवा पोस्ट ऑफिसमधील डिपॉझिटमध्ये मिळतो. या सर्वावर कर आकारला जातो. तशात पीपीएफ हे एकच प्राॅडक्ट राहते. तेसुद्धा चलनवाढीच्या जोखमीपासून अलिप्त राहू शकत नाही. चलनवाढीचा अर्थ वेगाने किमती वाढणे. ज्या गुंतवणुकीत कर भरल्यानंतर जास्त परतावा मिळत नाही ते महागाईमुळे नष्ट होतात. असा परतावा किंमतवाढीशी ताळमेळ राखत नाही. अन्य शब्दांत सांगायचे झाल्यास तुमची पैशाची क्रयशक्ती नाहीशी होते.

म्युच्युअल फंडात कराची रचना विशेष असते. इक्विटी इन्व्हेस्टमेंटवर कोणताही कर लागत नाही. त्याचबरोबर दीर्घ काळाच्या डेबिट रिटर्नमध्ये इंडेक्सेशन फायद्यामुळे दोन्ही प्रकारची जोखीम मिसळून जाते. याशिवाय बाजारात करन्सीचीही जोखीम असते. याचे व्यवस्थापन इंटरनॅशनल फंड, शेअर बाजारात अल्पावधीत होणारी खळबळ जुळून येते. यावरून निष्कर्ष असा की, म्युच्युअल फंडातून तुमच्या जोखमीची व्यवस्था करण्यासाठी वेगळे प्राॅडक्ट मिळतात. यासाठी तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओला सर्व जोखमीचे आकलन करूनच ठरवले पाहिजे.
(सेबीद्वारे नोंदणीकृत सल्लागार, सदस्य, एफपीजीआय)