स्पेनमध्ये घराणेशाहीची प्रथा आहे. तेथील महाराज जुआन कार्लोस (पहिले) यांनी नुकतीच एक घोषणा केली. 69 वर्षे सिंहासन सांभाळल्यानंतर राजकुमार फिलिप यांच्या हाती सत्ता देण्याचा निर्णय त्यांनी या घोषणेत जाहीर केला. त्यांच्या मते, सध्याचा काळ तरुण नेतृत्वाचा आहे. स्पेनमध्ये देशाचा तसेच लष्कराचा प्रमुख हा राजाच असतो. 18 जून रोजी फिलिप यांचा राज्याभिषेक होऊ शकतो. त्यासोबतच देशाच्या महाराणीचे पदही सोफिया यांच्याकडून राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय महिला प्रिंसेस लेटिजिया यांच्याकडे येईल. 1975 पासून महाराणीचा मुकुट सोफिया यांच्याकडेच आहे.
तरुणांसाठी काम करणार्या लेटिजिया काम आणि त्यांच्या दृष्टिकोनामुळे प्रसिद्ध आहेत. सामान्य लोकांनीही राजघराण्यात होणार्या बदलांचे स्वागत केले आहे. लोकांना फिलिप यांचे धोरण आवडते. ब्रिटिश राजघराण्यातील केट मिडलटन यांच्याप्रमाणेच लेटिजिया प्रसिद्ध आहेत. विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना त्या नेहमीच मार्गदर्शन करतात. राजकुमार फिलिप यांच्याशी लग्न करण्यापूर्वी लेटिजिया या पत्रकार आणि वृत्त निवेदक होत्या. हा त्यांचा दुसरा विवाह आहे.
राजकुमार फिलिप हे अॅथलीट असून सॅलिंग टीममध्ये त्यांनी देशाचे नेतृत्वही केले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी 1992 मध्ये बार्सिलोना गेम्समध्ये तसेच ऑलिम्पिकमध्येही सहभाग नोंदवला.
वार्षिक वेतन देण्याची नवी पद्धत
स्पेनच्या राजघराण्यातील दांपत्यांना प्रथमच वार्षिक वेतन देण्याची पद्धत नुकतीच सुरू करण्यात आली आहे. राज्याभिषेकाची घोषणा होण्यापूर्वीच राजकुमार फिलिप यांना 1 कोटी 28 लाख रुपये आणि लेटिजिया यांना 90 लाख रुपयांचे वेतन सुरू झाले होते.