आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संपत्ती... श्रीमंत मध्यमवर्गीय तरुणाई असलेले बडे देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील मध्यमवर्गीय तरुणांची संख्या ६६ कोटी आहे. विविध देशांत विविध स्तरांवर उत्पन्न असणारे हे तरुण आहेत. या तरुणाईकडे एकूण ५४ लाख खर्व रुपयांची संपत्ती असून ती जगातील एकूण संपत्तीच्या ३२ टक्के आहे. क्रेडिट सुइज रिसर्च इन्स्टिट्यूट या जागतिक पातळीवरील संस्थेने २०१५ मधील अहवालानुसार ही माहिती दिली आहे. या संस्थेच्या मते, अन्य देशांतील मध्यमवर्गातील तरुणांची स्थानिक खरेदी क्षमता अमेरिकेतील तरुणांप्रमाणे असावी. म्हणजेच या तरुणांचे उत्पन्न ३३ लाख ५० हजारांहून ३ कोटी ३५ लाख रुपयांदरम्यान असणे आवश्यक आहे. जगातील काही ठळक देशांतील मध्यमवर्गीय तरुणांच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊयात

अमेरिका- ११ लाख खर्व रुपये
लोकसंख्येच्या दृष्टीने चीन पुढे असला तरी मध्यमवर्गातील तरुणांच्या उत्पन्नात अमेरिका सर्वात पुढे आहे. तेथे मध्यमवर्गातील तरुणांची संख्या ९ कोटी २० लाख असून त्यांच्याकडे जगातील संपत्तीपैकी ६.७ टक्के संपत्ती आहे

जपान- ६.५० लाख खर्व रुपये
येथील ५९.५ टक्के मध्यमवर्गीय तरुणांकडे उपरोक्त संपत्ती आहे. गेल्या १५ वर्षांत त्यात ४२० खर्व रुपयांची घट झाली. त्यांची संपत्ती देशातील संपत्तीच्या ४९ टक्के, तर जगातील संपत्तीच्या ३.९ टक्के एवढी आहे.

चीन- ४.९० लाख खर्व रुपये
१० कोटी ९० लाख तरुणांची संपत्ती ४.९० लाख खर्व रुपये एवढी आहे. १५ वर्षांपूर्वी ती ३.८ कोटी एवढी होती. म्हणजेच त्यात १ लाख १४ हजार खर्व रुपयांची वाढ झाली. मध्यम तसेच अन्य वर्गातील संपत्तीत १५ वर्षांत सहापट वाढ झाली.

ब्रिटन- ४.१५ लाख खर्व रुपये
२.८ कोटी तरुण मध्यम वर्गात मोडतात. त्यांच्याजवळ ४.१५ लाख रुपयांची संपत्ती असून ती देशाच्या संपत्तीपैकी ३९.७, तर जगाच्या संपत्तीपैकी २.५ टक्के एवढी आहे.

जर्मनी- ३.२१ लाख खर्व रुपये
मध्यम वर्गातील २.८ कोटी तरुणांची संपत्ती ३.२१ लाख खर्व रुपये आहे. देशातील संपत्तीपैकी तिचा वाटा ३९.९ टक्के, तर जगातील संपत्तीपैकी १.९ टक्के आहे. १५ वर्षांत त्यात १.४ लाख खर्व रुपयांची वाढ झाली आहे.

कॅनडा - १.८० लाख खर्व रुपये
देशातील मध्यमवर्गीय तरुणांची संख्या १.३ कोटी आहे. २००० या वर्षातील येथील तरुणांची संख्या ३२ लाख होती, तर त्यांच्याकडील संपत्ती १.०७ लाख खर्व रुपये एवढी होती.

ऑस्ट्रेलिया - १.६७ लाख खर्व रुपये
मध्यमवर्गीय तरुणांची संख्या १.१ कोटी म्हणजेच ६६.१ टक्के एवढी सर्वाधिक
आहे. २००० या वर्षात त्यांची एकूण संपत्ती १.१३ लाख खर्व रुपयांवरून वाढून आज १.६७ लाख
खर्व रुपये एवढी आहे.

फ्रान्स - ३.२८ लाख खर्व रुपये
गेल्या १५ वर्षांत येथील मध्यमवर्गीय तरुणांची संख्या २.२ कोटींवरून वाढून ३ कोटींवर पोहोचली. मात्र, त्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. २००० या वर्षाच्या तुलनेत त्यांचे उत्पन्न ३.२८ लाख खर्व रुपये एवढे झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...