आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mining Of Trump Candidature In American Election

अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्पच्या उमेदवारीचा अर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेमध्ये गेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रबळ उमेदवार म्हणून पुढे आलेल्या सारा पालिन यांचा कल एका बाजूने झुकत असल्याचे दिसून येत आहे. पालिन यांनी जाहीर सभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीस पाठिंबा दर्शवून आश्चर्याचा धक्का दिला आहे. पालिन यासंदर्भात बोलत असताना शेजारीच उभे असलेल्या ट्रम्पच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

पालिनच्या या खेळीचा तिला काहीच फायदा होणार नाही. कारण ट्रम्प खासगी क्षेत्रातून पुढे आले आहेत, राजकारणातून नव्हे. दुसऱ्याच दिवशी पालिनने ट्रम्पच्या सभेत बराक ओबामांना तिच्या मुलाच्या अटकेवरून जबाबदार धरले. ट्रम्प यांचे प्रमुख स्पर्धक टेड क्रूज यांना पराभूत करण्याचे आवाहन लोव्हाचे गव्हर्नर टॅरी ब्रेनस्टॅड यांनी मतदारांना केले. तेव्हा तर ट्रम्प यांच्यासाठी हा आठवडा "सुपर वीक' ठरला. ते निवडणुकीत पुढे आहेत; परंतु राज्यातील लोकांचे काय? लोव्हाच्या लोकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. टेड क्रूज यांचा अक्षय इंधन देण्यास ठाम विरोध आहे, तर अक्षय इंधन सरकारच्या इथेनॉल कार्यक्रमाची संहिता आहे. लोव्हाच्या मका उद्योगासाठी इंधनाची गरज भासते.

पर्यावरण समूहाचे स्कॉट फेबर यांनी सांगितले, लोव्हामध्ये मक्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळते. १९९५ ते २०१२ पर्यंत तेथील शेतकऱ्यांना १ लाख कोटी रुपयांची सबसिडी मिळाली आहे. इथेनॉल कार्यक्रम, यात गॅसोलिनला बायोफ्युएलमध्ये मिसळले जाते. या मक्यामुळे किमती वाढतात. मक्याच्या शेतीमुळे पर्यावरणास हानी पोहोचते.

हे परंपरेच्या विरोधात असून साधारणत: नेते असाच मार्ग शोधत असतात, ज्यायोगे लोव्हाच्या लोकांना येनकेन प्रकारे सहभागी करता येईल. डोनाल्ड ट्रम्प यांना तर खूप आनंद झाला आहे. गव्हर्नरांच्या म्हणण्यास अनेकांनी समर्थन दिले. अक्षय ऊर्जा असोसिएशनला प्रत्येक ठिकाणी बायोफ्युएल हवे आहे. उलट त्याचे प्रमाणही वाढवून मिळायला हवे. तिकडे ट्रम्प आपले भाषण तयार करण्यात मग्न आहेत. ते स्वत: त्यांचे भाषण लिहितात. ते देशात कोठेही जाऊ शकतात. ते सतर्क असे राजकारणी बनत आहेत.
© The New York Times