आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Pankaja Munde News In Marathi, Sandharsh Yatra

पंकजांच्या संघर्षाची यात्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी १९९४ मध्ये काढलेल्या संघर्ष यात्रेचा दुसरा अध्याय त्यांची कन्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी दोन दआसांपूर्वी सुरू केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेने राज्यात सत्तापरआर्तन सोपे केले होते. पंकजा यांच्या संघर्ष यात्रेकडेही राज्यातला भारतीय जनता पक्ष त्याच नजरेने आणि अपेक्षेने पाहत असणे स्वाभाआक आहे. मात्र, पंकजा यांचा उद्देश केवळ तेवढ्यापुरता मर्यादित आहे असे वाटत नाही. यात्रेदरम्यान त्यांनी शुक्रवारी नांदेडमध्ये केलेल्या आधानाकडे गांभीर्याने पाहिले तर ते अिधक ठळकपणे जाणवते. आपल्याला मंत्रिपद अनुकंपा तत्त्वावर नको आहे, असे त्यांनी ठणकावून सांिगतले. ही ‘अनुकंपा’ आपल्याला काही दआसांसाठी काहीतरी देऊन जाईल; पण त्यामुळे आपले नेतृत्व मारले जाईल, ही त्यांची भावना आहे आणि म्हणून आपल्या नेतृत्वक्षमता सिद्ध करण्यासाठीचाच त्यांचा हा संघर्ष आहे. गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून कौटुंबिक आणि जनुकीय वारसा त्यांच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही हे खरे आहे; पण पंकजा यांना तेवढ्यावर थांबायचे नाही, असे त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहे. त्यांना गोपीनाथ मुंडे यांची राजकीय वारसदार म्हणूनच स्वत:ला सिद्ध करायचे आहे. अर्थात, राज्यात युतीची सत्ता आली तर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री बनतील, पण म्हणून पंकजा यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे असा राजकीय वारशाचा अर्थ होत नाही. राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचे स्थान केवळ आमदार, खासदार किंवा मंत्री वा माजी उपमुख्यमंत्री एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. पंकजा यांच्याच शब्दात सांगायचे तर ते लोकनेते होते आणि पंकजा यांनाही ते स्थान मिळवायचे आहे. वय आणि अनुभव कमी असूनही राजकीय प्रगल्भता आणि चातुर्य आपल्यात किती आहे हे पंकजा यांनी वडिलांच्या जाण्यानंतर दाखवून दिले आहे. तरीही अनुभव आणि वयाचे गणित मांडून त्यांना सहानुभूती दाखवत ती सहानुभूतीही ‘कॅश’ करण्याचे भाजपातीलच नेत्यांचे प्रयत्न आहेत. त्याआरुद्धही पंकजा यांचा हा ‘संघर्ष’ आहे.