आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत, शेतकरी कुटुंबात जन्मलेला महान लेखक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात शिवाजीरावांचा जन्म झाला. लहान वयातच पितृप्रेमाला पारखे झालेल्या शिवाजीरावांचा स्वभाव यामुळेच हळवा बनला होता. महाभारताविषयी आणि त्यातील कर्णाविषयी आपल्याला काही तरी भरीव लिहायचा निश्चय शिवाजीरावांनी मनाशी केला होता. याविषयीची टिपणं ते काढू लागले.


1960 ते 1963 या काळात त्यांनी याविषयीचं अफाट वाचन केलं. पाटण्याचे हिंदीतील ख्यातनाम कवी प्रभात ऊर्फ केदारनाथ मिश्र यांनी लिहिलेलं कर्ण हे खंडकाव्य हाती पडलं. शिवाजीरावांनी ‘मृत्युंजय’चं लेखन सुरू केलं. जिथं महाभारत घडलं त्या कुरुक्षेत्रावर जाण्याची निकड त्यांना वाटू लागली. साहित्यामध्ये रस असणा-या तत्कालीन सिव्हिल सर्जननी शिवाजीरावांना या प्रवासासाठी खोटं आजारी पाडलं आणि तसं प्रमाणपत्रही दिलं. रजा मिळाली; परंतु खिशात होते फक्त 50 रुपये. शिवाजीराव आपल्या मित्रासह थेट गेले चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे. त्यांना मनीचा हेतू सांगितला. त्याक्षणी भालजींनी 125 रुपयांचा धनादेश देऊन भवानी केली. कोल्हापूर आणि जवळच्या अनेक सहका-यांनी 1800 रुपयांची मदत गोळा केली आणि शिवाजीराव कुरुक्षेत्री निघाले. मुंबईत प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मधुकरराव चौधरी यांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेतला. लक्ष्मणशास्त्रींनी दिल्लीतील वास्तव्यासाठी यशवंतराव चव्हाण यांना पत्र दिले. राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी यांच्यासह अनेकांच्या सहकार्यानं शिवाजीराव कुरुक्षेत्री पोहोचले. शिवाजीराव कोल्हापुरात आले ते भारलेपणानंच. दसरा चौकातील पोलिस क्वार्टर्समध्ये शिवाजीरावांचे पोलिस खात्यातील भाऊ विश्वासराव राहत होते. त्यांच्याच खोलीत बसून शिवाजीरावांनी आधी लिखाण सुरू केलेल्या कादंबरीचा प्रवास झपाटल्या अवस्थेत पूर्ण केला आणि चार वर्षांत 1500 पानांच्या मृत्युंजय कादंबरीचे हस्तलिखित तयार झालं.


आणखी माहिती वाचण्यासाठी पुढील स्लाईड्स क्लिक करा...