आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरब: राजकीय उलथापालथीचे वारे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

र्वात शक्तिशाली, धनाढ्य म्हणजे सौदी अरेबियाचा राजा. आज त्याचे सिंहासन डळमळीत आहे. तेलसंपत्तीच्या बळावर आशिया खंडात त्याचा आवाज बुलंद आहे. मात्र, आता त्या साम्राज्याला घरघर लागेल अशीच स्थिती आहे. त्याच्या घरातीलच एकाने बंडाचे निशाण रोवले. राजकुमार सत्तापालट करण्यासाठी आतुर आहे. याचे व्हायचे ते परिणाम होतील, मात्र जगात सर्वाधिक खनिज तेल उत्पादन करणारा सौदी अरेबिया तेल संकटाला जबाबदार राहिल्यास आश्चर्य ठरणार नाही. 


रियाधहून येणाऱ्या बातम्या सांगताहेत की तेथे सर्वकाही आलबेल नाही. कौटुंबिक सत्तेला कुटुंबातूनच आव्हान मिळत असते. त्यामुळे एका राजकुमाराने दुसऱ्याविरुद्ध बंड केल्यास त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. २० व्या आणि २१ व्या शतकात प्रत्येक देशात लोकशाही बळकट होत आहे. मात्र, आशियातील अरबस्तानात राजे-राजवाडे, शेख आणि बादशहांची हुकूमशाही चालते. इराणमध्ये दीर्घकाळ शाही घरण्याने सत्ता भोगली. पश्चिम आशियात अरब राजे आणि शेख यांचे वर्चस्व राहिले. सौदी अरेबियाचा राजा तेल संपत्तीच्या बळावर गुरगुरतो आहे. कुवैत आणि अबुधाबीचे शेख तसेच इराणचे राजेही आपल्या राजेशाहीच्या बळावर ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगले. मात्र, काळ बदलला. लोकशाहीच्या वावटळीत त्यांचे साम्राज्य भुईसपाट झाले. यापैकी सर्वात शक्तिशाली, धनाढ्य म्हणजे सौदी अरेबियाचा राजा. आज त्याचे सिंहासन डळमळीत आहे. तेलसंपत्तीच्या बळावर आशिया खंडात त्याचा आवाज बुलंद आहे. मात्र, आता त्या साम्राज्याला घरघर लागेल अशीच स्थिती आहे. त्याच्या घरातीलच एकाने बंडाचे निशाण रोवले. राजकुमार सत्तापालट करण्यासाठी आतुर आहे. याचे व्हायचे ते परिणाम होतील, मात्र जगात सर्वाधिक खनिज तेल उत्पादन करणारा सौदी अरेबिया तेल संकटाला जबाबदार राहिल्यास आश्चर्य ठरणार नाही. 


तेथील एका अब्जाधीश राजाला बेड्या हा साऱ्या जगात चर्चित विषय आहे. तेथील ११ राजकुमारांना गजाआड जावे लागले. त्यात मध्यपूर्वेतील वॉरेन बफे म्हटले जाणाऱ्या प्रिन्स अलवलीद बिन तलाला यांचा समावेश आहे. आपल्या तेलाचा पैसा त्यांनी साऱ्या जगात गुंतवल्याचे ऐकिवात येते. हे नाव जगाला नवे नाही. बिल गेट्सपासून रुपर्ट मर्डोक आणि मायकल ब्लूमबर्गसारख्या कॉर्पोरेट व्यक्तींशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. १९ अब्ज डॉलर इतकी त्यांची अफाट संपत्ती असल्याचे बोलले जाते. त्यानुसार ते जगातील ५० वे श्रीमंत ठरतात. राजकुमार तलाला रियाधस्थित गुंतवणूक कंपनी किंग्डम होल्डिंगचे संस्थापक आहेत. यासारख्या घटनाक्रमांनी सौदी अरेबियात तेल किमतीत चढउतार होतच असतो. या घटनांमुळे सौदी सरकार सक्रिय झाले आहे.  अर्थात हा खासगी विषय असला तरी सरकार सक्रिय झाले आहे. सौदी अरेबियात या अटकेपूर्वी राजे सलमान यांनी भ्रष्टाचारविरोधी समिती स्थापन केली. या समितीचे नेतृत्व ३२ वर्षीय क्राऊन प्रिन्स सलमान बिन मोहंमद करत आहेत. ते परिवारातील प्रागतिक विचारधारेचे जनक मानले जातात. त्यामुळे या प्रकरणात ज्यांना अटक झाली ते समाजहिताचे मानले जात आहे. यामुळे मंत्रिमंडळातही परिवर्तन झाले. राजकीय वातावरण बदलाचे संकेतही आहेत. हे परिवर्तन क्रांतिकारी आहे.  इस्लामी कट्टरता घटण्याचा अंदाज आहे. तेथील महिलांना कार चालवण्याची परवानगी, हे ताजे उदाहरण. २०३० पर्यंत अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक मजबूत करण्याचा विचार आहे. सोबतच तेलावर आधारित अर्थव्यवस्थेपासूनही सौदीला मुक्त करण्याचा विचार आहे. त्यामुळे या धोरणाला तीव्र विरोध होऊ शकतो. राजकुमार क्राऊन यांची ताकद वाढत आहे. सततच्या सुधारणांमुळे जनमत क्रोधित झाले आहे. त्यामुळे सत्ता उलथवण्याचा विचार जोर पकडत आहे. अशा स्थितीत ज्या लोकांकडून आव्हान मिळू शकते त्यांचा बंदोबस्त केला जात आहे. राजकुमारांचे बंधू मोहंमद बिन नाइफ यांना काही काळापूर्वीच गृहमंत्री पदावरून हटवले गेले. 


एकेकाळी गादीचे दावेदार मानले गेलेल्या राजकुमार मितेब बिन अब्दुल्ला यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालय होते. माजी अर्थमंत्री अब्राहम अल आसिफ यांनाही पदच्युत करण्यात आले आहे. अर्थमंत्री अब्दुल फकीह तुरुंगात आहेत. त्यांच्यावर प्रगतिशील कायद्याचे समर्थक असा आरोप आहे. तुरुंगात गेलेल्या रियाधमधील अन्य लोकांत रियाधचे माजी गव्हर्नर तसेच रॉयल कोर्टाचे प्रमुख राहिलेल्या खालिद अल तुवाईजिरो यांचाही समावेश आहे. सौदी बिन लादेन निर्माण समूहाचे चेअरमन बकर बिन लादेन यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक झाली. एमबीसीटीव्ही नेटवर्कचे मालक अल वलीद अल इब्राहिमनाही बंदी बनवण्यात आले. या उलथापालथीचा परिणाम म्हणजे वेगाने वाढणाऱ्या तेल किमती. 


हे प्रकरण येथेच थांबले नाही. ११ राजकुमार आणि शाही परिवारातील अन्य ३८ व्यक्तींना रियाधनजीक पाच पंचतारांकित हॉटेलमध्ये नजरकैद करण्यात आले आहे. रियाधमध्ये उठलेल्या या वादळात अनेक राजकुमार तसेच त्यांच्या निकटवर्तीयांना नजरकैद व्हावे लागले. या नजरकैद वा अटकेतील व्यक्तींमध्ये महिलांचादेखील समावेश आहे. मोबाइल काढून घेण्यात आलेत. दूरध्वनी सेवा कापण्यात आली आहे. कोण कुठे आहे याचा कोणालाच थांगपत्ता नाही. राजधानी रियाधमध्ये केवळ स्मशानशांतता आहे. विदेशी पत्रकारांना एक तर देश सोडण्यास सांगण्यात आले वा विचारल्याशिवाय काहीही लिहिण्यास बंदी आहे. राजधानीच्या आसपासच्या क्षेत्रात सन्नाटा आहे. एवढे होऊनही परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. सौदीत खरेच काही परिवर्तन होत आहे की सत्ताधीशच सर्वांना हाताशी धरून परिवर्तनाचे नाटक करत आहेत, हे अजूनही कोडेच आहे. सौदीतील प्रसारमाध्यमांवर कडक निर्बंध आहेत. त्यामुळे वस्तुस्थितीपासून सारे जगच अंधारात आहे. सौदीतील वर्तमानपत्रेही बाजारातून गायब झाली आहेत. सौदीचे उत्तराधिकारी मोहंमद बिन सलमान यांच्या नेतृत्वातील समितीने भ्रष्टाचार तसेच मनी लाँडरिंगविरुद्ध खर्वपती राजकुमार अलवलीद बिन तलालासह ११ राजकुमार, चार मंत्री आणि अनेक माजी मंत्र्यांना अटक केली. त्यांना रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये ठेवले आहे. सौदीच्या राजाने रविवारी मोहंमद बिन सलमान यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचार निर्मूलनासंबंधी एक समिती घोषित केली. या समितीने आतापर्यंत अनेक शाही परिवारांचे राजकुमार आणि प्रभावशाली अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. रियाधच्या यमामा नामक महालात यासंबंधी बैठक झाली. सौदीची अर्थव्यस्था तसेच वर्तमान स्थितीवर चर्चा झाली. भ्रष्टाचारावरही खलबते झडली. बैठकीत कोणत्याही राजकुमाराचा मृत्यू झाल्याचे वा तो देश सोडून पळाल्याच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले. आधीचे राजे फहद यांचा मुलगा मारला गेल्याच्या वृत्ताचा इन्कार करण्यात आला. एकही राजकुमार इराणला पळून गेला नाही, असे ठासून सांगण्यात आले.

 
एका बातमीनुसार गेल्या ४८ तासांत सौदीचे राजकुमार अल वलीद बिन तलाला यांना चल आणि अचल संपत्तीत ८ हजार ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली त्यांना अटक झाली आहे. त्यानंतर त्यांच्या संपत्तीत एकूण २८० कोटी डॉलरची घसरण झाली. राजकुमार अलवलद बिन तलाल आपल्या कंपनीत सर्वाधिक महिलांना नोकरी देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तलाल यांच्या कंपनीत ६२ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.


- मुझफ्फर हुसेन, ज्येष्ठ पत्रकार

बातम्या आणखी आहेत...