आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत का जादू चलेगा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि तामिळ सिनेस्टार रजनीकांत यांची रविवारी चेन्नईत झालेली भेट ही तामिळ नववर्षांबद्दल सदिच्छा भेट असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे असले तरी हा योगायोग नक्कीच नव्हता. कारण दक्षिणेतील तामिळनाडू हे एकमेव राज्य असे आहे की, भाजपने या राज्यातील पाच घटक पक्षांशी युती केलेली आहे. या राज्यात 39 लोकसभा जागांपैकी आठ जागांवर भाजप लढत देत आहे. उरलेल्या जागा त्यांचे मित्रपक्ष डीएमडीके, एमडीएमके, पट्टाली मक्कल कटची व अन्य स्थानिक पक्ष लढवत असून या सर्वांचा थेट सामना जयललिता यांच्या अण्णा द्रमुक व करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाशी होत आहे.

जयललिता यांनी एनडीए आघाडीपासून स्वत:ला दूर केल्यामुळे व द्रमुकनेही पाने पुसल्यामुळे भाजपची पंचाईत झाली होती. या पार्श्वभूमीवर रजनीकांतची भेट घेतल्याने त्याच्या लोकप्रियतेचा फायदा मिळेल असा राजकीय हिशेब आहे. मोदींनी रजनीकांतसोबत सुमारे अर्धा तास गप्पा मारल्या. तामिळ लुंगी घालून रजनीकांतसोबत प्रसारमाध्यमांना फोटोही काढू दिले. अशाही बातम्या आल्या की मोदींचा शर्ट चुरगाळला होता व चुरगाळलेला शर्ट घालून रजनीकांतची भेट घेणे त्यांना योग्य वाटले नाही. मोदींना मग कडक इस्त्रीचा शर्ट लगेचच देण्यात आला व ते रजनीकांतची भेट घेण्यास गेले. नंतर मोदींनी लुंगी घालूनच सभेला संबोधित केले. या भेटीचे राजकीय पडसाद नंतर काही तासांतच उमटले. कारण मोदींनी रजनीकांतची भेट घेणार असल्याची पूर्वसूचना डीएमडीके प्रमुख नेते व सिनेस्टार विजय कांत यांना दिली नव्हती. त्याची नाराजी म्हणून विजयकांत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोदींच्या स्वागतास जाऊ नये असेही फर्मान काढले होते.