आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाच्या कॅमेऱ्याने टिपली मंगळावर महिलेची छबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळ ग्रहाबद्दल पृथ्वीतलावर माणसाला असलेले आकर्षण नवीन नाही. म्हणूनच नासासारख्या संस्थेने मंगळ ग्रहापर्यंत मजल मारली. शिवाय भारताने आपली मंगळ मोहीम सुरू केली आहे. याच मंगळावर टिपलेल्या एका छायाचित्रात एका महिलेसारखी छबी नासाच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून याबद्दल प्रचंड उत्सुकता पसरली आहे.
नासाच्या क्युरिऑसिटी बग्गीने हे छायाचित्र टिपले असून यात एक महिला स्पष्ट दिसत आहे. एका मोठ्या खडकावर ही महिला उभी असल्याचे दिसत असून हे छायाचित्र आकाराने अत्यंत लहान असल्याचे त्यातील तथ्यांश किती हे नासाचे तज्ज्ञ तपासत आहेत. ही एखादी महिलाच असल्याबद्दल नासाने ठोस पुष्टी देण्याआधीच हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
मंगळ ग्रहावर जीवसृष्टी असल्याची पुरातन काळापासून वदंता आहे. याआधारेच नासाने मंगळ माेहिमा आखल्या. क्युरिऑसिटीसारखी आधुनिक बग्गी मंगळावर पोहोचवली. ही बग्गी मंगळावरील छायाचित्रे पाठवत असून अशाच एका छायाचित्रात चक्क महिला दिसल्याने नासाच्या शास्त्रज्ञांचेही डोळे विस्फारले. हे छायाचित्र नेमके मंगळाच्या कोणत्या भागात घेण्यात आले, ते नेमके कोणत्या वेळी घेण्यात आले याची शहानिशा शास्त्रज्ञ करत आहेत.
यापूर्वीही मंगळ ग्रहावर एक खेकडा दिसल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र, त्यात तथ्यांश आढळला नाही. असे अनेक प्रकारचे आकार आजवर मंगळाच्या पृष्ठभागावर पाहावयास मिळाले असले तरी निश्चितपणे हे अाकार नैसर्गिक आहेत की तेथे एकेकाळी असलेल्या जीवसृष्टीचे हे अवशेष आहेत यावर ठाम मत शास्त्रज्ञ मांडू शकलेले नाहीत.