आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंजाबमध्ये ‘सिद्धू फॅक्टर’ प्रभावी ठरणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदा पंजाबमधील निवडणुकांचे निकाल धक्कादायक असू शकतात. भाजपवर नाराज नेत्यांमध्ये शत्रुघ्न, अडवाणी, जोशी यांचा समावेश आहे . निवडणुकीत प्रभावी ठरतील अशा नेत्यांमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांची मोठी भूमिका आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने भाजपतून बाहेर पडलेल्या सिद्धू यांच्यासमोर पायघड्या टाकल्या होत्या. मात्र त्यांनी वेगळा पक्ष काढून सर्वच पक्षांना संकटात टाकले आहे.

लोकसभेत आम आदमी पार्टीला पंजाबमधून दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र दिल्लीतील पक्षाची सद्य:स्थिती पाहता जनता या पक्षाच्या उमेदवारांपासून दूरच राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस मात्र करिश्म्याच्या अपेक्षेत आहे. सर्व पक्षांमधील वादाचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो. सिद्धू यांनी कपिल शर्माचा कार्यक्रम आणि राज्यसभेचे सदस्यत्व सोडल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. सर्वच पक्ष आपणच विजयी होणार असा डांगोरा पिटत आहेत.
निवडणूक पूर्व अंदाजानुसार, काँग्रेसला जनतेने ३३ % तर आम आदमी पार्टीला २५ % कौल दिला आहे. काँग्रेसकडे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आहेत. त्यानंतर आम आदमीची लोकप्रियता आहे. सिद्धू यांनी नवा पक्ष स्थापन केला असला तरी या पक्षाला ८ % लोकांची पसंती आहे. युती करावी लागल्यास सिद्धू यांचा पक्ष आप किंवा काँग्रेसशी हातमिळवणी करेल. तो भाजप किंवा अकाली दलासोबत जाणार नाही.

एकूणच यंदाच्या निवडणुकीत विजय कुणाचाही झाला तरी सिद्धू फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहेे. या नव्या पक्षामुळे भाजपचे नुकसान होऊ शकते, तर अन्य पक्षांसाठी यामुळे चांगलाच फायदा होऊ शकतो. निकाल आणखी धक्कादायक ठरल्यास सिद्धू यांच्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळे पंजाबातील निवडणूक निकाल पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
- अमन शर्मा २५
अॅल्युमनाई वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट अॅल्युमनाई आयआयएससी, बंगळुरू
बातम्या आणखी आहेत...