आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नौदलाच्या ताफ्यात सुसज्ज आयएनएस चेन्नई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय नौदलात कवच यंत्रणायुक्त आयएनएस चेन्नई या युद्धनौकेचा नुकताच समावेश झाला आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने हे जहाज बनवले आहे. या जहाजावर जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रासह कवच यंत्रणेचा समावेश आहे. या यंत्रणेद्वारे दोन हेलिकॉप्टरही वाहून नेले जाऊ शकतात.
एवढे अद्ययावत जहाज आपल्या नौदलात सामील होणे म्हणजे आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे आल्यासारखे आहे. हे जहाज ६० टक्के स्वदेशी बनावटीचे असल्याने आपली स्वयंपूर्णतेकडे चांगली वाटचाल सुरू आहे असे दिसते.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे देशाच्या सुरक्षेसाठी तरी अन्य देशांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही, अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या प्रकल्पांतर्गत बनलेले हे आजवरचे सर्वात मोठे जहाज आहे. २०२७ पर्यंत आपल्या ताफ्यात ६०० युद्धविमाने व हेलिकॉप्टर्ससह २०० जंगी जहाज सामील होणार, अशी नौदलाची योजना आहे. मेक इन इंडियाअंतर्गत हा प्रकल्प यशस्वी केला जाईल. त्यामुळे आगामी काही वर्षांत युद्धाबाबतीत स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासू देश अशी भारताची प्रतिमा तयार होईल.
याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चीन व पाकिस्तानसारख्या आंतरराष्ट्रीय सीमांवरील युद्धात आपण बलशाली ठरू. शत्रू देशांना आपल्या मर्यादेत राहण्याचा इशाराही आपण देऊ शकतो. परिणामी शत्रूंची आपल्याकडे मान वर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. व्यापक अर्थाने विचार केल्यास मेक इन इंडियाअंतर्गत बनणारे असे मोठे जहाज तसेच आधुनिक उपकरणांमुळे देशातील रोजगारही वाढतील. सतर्कता आणि कौशल्यपूर्ण केलेल्या या कामामुळे देशाच्या सुरक्षेलाही मदत होईल.
अनुषा शर्मा,२१
यूआयटी,आरजीपीव्ही, भोपाळ
बातम्या आणखी आहेत...