आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Trend Old Gadget Repair And Use, Divya Marathi

जुन्याच गॅजेटला दुरुस्त करून वापरण्याचा ट्रेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिन्सेंट लाय (४९) न्यूयॉर्कमध्ये एका जुन्या, नादुरुस्त मोबाइल फोनच्या रिसायकलिंग केल्या जाणाऱ्या फर्ममध्ये काम करतात. नुकताच त्यांना पाम ट्रिओ स्मार्टफोन मिळाला. गेल्या दशकात लोकांनी अशा फोनचा वापरही केलेला नव्हता. ट्रिओ फोन अजूनही कामात येतो, असे लाय यांना आढळून आले. तो मोबाइल घेऊन ते घरी आले. त्याला रोज वापरण्यायोग्य बनवले. एखाद्या आजारी पशूवर उपचार करून त्याला बरे करतात तसेच या मोबाइलचे झाले.

व्हिन्सेंट लाय यांनी सांगितले, निकामी गॅजेट्स घरी घेऊन जाण्याच्या कारणावरून २०१० मध्ये या रिसायकलिंग करणाऱ्या फर्ममधून मला काढून टाकण्यात आले. त्यानंतर ते "फिक्सर्स कलेक्टिव्ह' मध्ये काम करू लागले. हा न्यूयाॅर्कचा सोशल हब असून या ठिकाणाहून जुनी उपकरणे दुरुस्त करून त्यांना नव्याप्रमाणे बनवली जातात. सध्या अनेक कंपन्या अशा लोकांना गॅजेट्स अपग्रेड करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. म्हणजे कोणत्याही जुन्या उपकरणांना कोणत्याही पद्धतीने चांगले बनवणे. अमेरिकेत अॅपल, एटी अँड टी आणि टी मोबाइलसारख्या कंपन्या "अर्ली अपग्रेड प्लॅन' ऑफर करत आहेत. यामुळे ग्राहकांना दरवर्षी नवा फोन खरेदी करता येतो. अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष (वर्ल्डवाइड मार्केटिंग) फिलिप शिलर यांनी सांगितले, आज पाच वर्षांहून जुने असलेले ६० कोटींहून अधिक संगणक आहेत. व्हिन्सेंट लाय यांच्या कामाची पद्धत कशीही असो, पण पाम ट्रिअो फोनचे काम करण्याचा अनुभव खूप दांडगा आहे. जर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाची एखाद्या कारप्रमाणे काळजी घेत असाल तर अनेक वर्षे तुमच्या गॅजेटच्या वापराबद्दल समाधानी राहू शकता. जर आपल्याकडील पूर्वीचेच गॅजेट दर्जेदार असेल तर नवे विकत घेण्याची गरज काय? असा विचार आता अनेकजण करू लागले आहेत. इंडस्ट्री डेटानुसार ग्राहक नवा फोन खरेदी करण्याचे टाळत आहेत. व्हिन्सेंट लाय आणि आय फिक्सिटचे प्रमुख कायल विन्स यांनी स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संगणकांची लाइफ कशी वाढवावी याची लोकांना माहिती दिली.

मोबाइल फोन
जर मोबाइल फोन चांगला चालणारा असेल तर त्याचा दीर्घकाळ वापर करता येतो. पाच वर्षांपूर्वीचा जुना संगणक आजही चांगले काम करू शकतो. आपल्याला अॅपची संख्या, बॅटरीची लाइफ आणि स्टोअरेज क्षमता याची काळजी घेतली पाहिजे.

संगणक
संगणकाचे सुटे भाग मोबाइलच्या तुलनेत सहज बदलता येतात. यात दुरुस्ती खूप कमी लागते. हार्ड डिस्कसाठी सॉलिड स्टेट ड्राइव्ह स्वीकारली पाहिजे. ती जलद आहे आणि टिकाऊ आहे.
© The New York Times