आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"द न्यूयॉर्क टाइम्स'मधून; श्रीमंतांची मुलेच शिक्षणात अग्रेसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्थिक व सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर कार्यरत ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) या संस्थेनुसार, गणित व विज्ञान या विषयांत अमेरिकी मुलांची बुद्धिमत्ता सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. सध्या अमेरिकी मुलांचा हा गुणानुक्रम १९ व्या स्थानी आहे. यात काही सुधारणा झाली, तर आगामी ३५ वर्षांत देशाला सकल उत्पादनात १.७ टक्के वाढ होईल. ज्या मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी प्रयत्न केले जातील ते उच्चशिक्षणानंतर विविध क्षेत्रांत कार्यरत होतील आणि तेथे त्यांचे कौशल्य कामी येईल.

अमेरिकेत शिक्षण तसेच मुलांशी संबंधित विषयांवर संशोधन करणारी "वॉशिंग्टन सेंटर फॉर इक्विटेबल ग्रोथ’नुसार अमेरिकेला आगामी तीन-चार दशकांपर्यंत वेगवान प्रगती करायची असेल, आपले अव्वल स्थान टिकवून ठेवायचे असेल तर मुलांच्या शिक्षणात असलेला असमतोल दूर करावा लागणार आहे. हे प्रयत्न केले जात असताना कदाचित सरकारला सध्यापेक्षा अधिक निधी खर्च करावा लागू शकतो. याचा लाभ अर्थातच आगामी काळात संपूर्ण देशाला होऊ शकेल. मुलांची बुद्धिमत्ता व कौशल्य विकसित झाले तर त्याचा फायदा महसुलाच्या रूपाने होणार आहे.
एका अंदाजानुसार यामुळे अमेरिकेच्या महसुलात ९०० अब्ज डॉलरची वाढ होईल. हा अहवाल तयार करणारे अर्थतज्ज्ञ रॉबर्ट जी. लिंच यांच्या मते, अमेरिकी नागरिकांनी या दिशेने प्रयत्न करून आपला क्रम कॅनडाच्या बरोबरीत आणला, तर २०५० पर्यंत देशांतर्गत सकल उत्पादनात ६.७ टक्के वाढ होईल. ओईसीडीनुसार कॉनडाचा क्रम सध्या ७ व्या स्थानी आहे. यामुळे महागाईनुसार विचार करता एकूण वृद्धी १० खरब डॉलर होईल. या दृष्टीने अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी आपले लक्ष्य निश्चित असावे, अशी त्यांची धारणा आहे.

अहवालात लिंच यांनी म्हटले आहे की, जे लोक सध्या उच्च स्थानी आहेत त्यांच्या उत्पन्नात सतत प्रचंड वाढ होत आहे. जे लोक कसेबसे घर चालवतात त्यातील २० टक्के लोकांचे सरासरी आयुष्य कमी झाले आहे. यात वरच्या क्रमावर असलेले ५ टक्के लोक आपले जीवनमान आणि उत्पन्नाबाबत समाधानी आणि मजेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचे उत्पन्न ८० टक्क्यांनी वाढले आहे.
अर्थतज्ज्ञ लिंच यांच्या मते, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीला नुकसानीच्या रूपात पाहणे चुकीचे आहे. यामुळे अधिक नुकसानच होईल. शिक्षणातील असमतोल आपण दूर करू शकलो तर कराच्या रूपाने महसुलातही प्रचंड वाढ होईल. लिंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासात जो आधार मानला तो २०१२ मधील इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट प्रोग्रॅम होता. ही अशी चाचणी असते जिचा वापर आज जगभरात शिक्षण क्षेत्रातील यशाचे मूल्यमापन करण्यासाठी केला जातो. यात अमेरिकेची सरासरी पातळी ९७८ आहे, तर ओईसीडीची सरासरी ९९५ आहे. कॅनडाची १०४४, जपानची १०८३, तर कोरियाची सरासरी १०९२ आहे. शिक्षण क्षेत्रातील असमतोल अमेरिकेत संपवता आला, तर अमेरिकेची सरासरी १०८० अंकावर जाईल. यामुळे कोरिया व जपाननंतर अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर येईल.

वॉशिंग्टन सेंटर फॉर इक्विटेबल ग्रोथमधील संशोधकांनुसार, शिक्षणाच्या समान संधीवरच आता लक्ष केंद्रित करावे लागेल. यासाठी मुले व युवा पिढीला अधिक कुशल बनवावे लागेल. ही मुले चांगली शिकली, त्यांना समान ज्ञान मिळाले, तर देशासाठी ते अधिक योगदान देतील. संशोधकांच्या मते, गरीब व श्रीमंत मुलांच्या अभ्यासक्रमात पण खूप फरक आहे. यासाठी गणित व विज्ञान विषयांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कारण, अमेरिकी मुले याच दोन विषयांत ३३ औद्योगिकदृष्ट्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. उलट कोरिया, पोलंड व स्लोव्हेनियामध्ये स्थिती चांगली आहे.

© The New York Times