आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द न्यूयॉर्क टाइम्समधून: तिप्पट कमाईच्या लालसेने मानवी तस्करीत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहा पोरिर बेटातील महंमद हुसेन खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दुकान चालवतात. त्यांना काही दिवसांपूर्वी समजले की, रात्रीच्या वेळी त्यांच्या गावातून ज्या नावा जातात, त्यात मासे नसून माणसांना सीमेपलीकडे पाठवले जाते. काही दिवस त्यांनी या हालचालीवर बारीक नजर ठेवली. यात त्यांना मानवी तस्करीच्या धंद्यांची खात्री पटली. गेल्या काही वर्षांत भारत-बांगला देश सीमेवर सुरक्षा कडक करण्यात आल्याने मानवी तस्करीचा व्यापार करणाऱ्यांनी बांगला देशातील पूर्व सीमेवरील गावास आपले मुख्य केंद्र बनवले आहे. तेथे रात्रीच्या अंधारात माणसांना घेऊन निघालेल्या नावेस टाॅर्चच्या प्रकाशात सीमेपलीकडे पाठवण्यात येते. नाव पार झाली आहे, असा संकेत यात मिळतो. टाॅर्चच्या प्रकाशाच्या सिग्नलमुळे तिकडच्या हालचाली वाढतात आणि तेथे माणसांना ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली जाते. म्हणजे रस्ता "क्लिअर' करणे.

मला जेव्हा लोकांच्या बोलण्यातून अशी माहिती मिळाली की, शहा पोरिर बेटातील लोकांना समजते की, सगळ्याच नावेत मासे नसतात. या कामात मच्छीमार, स्थानिक व्यापारी, पोलिस अधिकारी आणि त्यांचे बॉस सहभागी असतात. या सगळ्यांच्या संगनमतामुळेच हा व्यवसाय चालतो आहे. काही लोक निगराणी करतात, तर काहीचा सहभाग असतो. लाखो रुपयांच्या बदल्यात माणसाची"खेप' पलीकडे पाठवली जाते. काही दिवसांपूर्वीच बेटातून निघालेली एक नाव त्या किनाऱ्यावर पोहाेचण्यापूर्वीच पाण्यात बुडाली, तेव्हा या गोरखधंद्याचा गौप्यस्फोट झाला. यात माशांऐवजी माणसांची प्रेते निघाली. या घटना सातत्याने घडत होत्या. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सगळी माहिती उघड झाली. तेव्हा जगाला कळले की, मानवी तस्करीचा व्यवसाय खूप वेगाने वाढतो आहे.

माणसांना नावेत कोंबून म्यानमार आणि मलेशियाच्या सीमेनजीक असलेल्या थायलंडमधील शिबिरात पोहाेचवले जाते. तेथे माणसांना काही दिवस उपाशी ठेवण्यात येते. छळ केला जातो. यामध्ये महिलाही असतात. त्यांना कसे वागवले जाते, याची कोणासही कल्पना नाही. त्यांची सुटका करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडे २ ते २.५ लाख रुपयांची मागणी केली जाते. एक तृतीयांश कुटुंबे ही रक्कम देऊन आपल्या लोकांना घेऊन जातात. शिबिरातील इतर लोकांची प्रकृती बिघडलेली असते. त्यांना नावेत टाकून भरसमुद्रात मरण्यासाठी टाकून दिले जाते.
म्हणजे देवाच्या भरवशावर
मी अन्य भागातही गेले होते. येथे लोकांशी बोलल्यानंतर असे समजले की, या व्यापारांबद्दल लाेकांना भीतीही वाटत नाही किंवा त्यांना आश्चर्याची बाब वाटत नाही. काही माणसे पैशाच्या लालसेपोटी वाट्टेल ते करण्यास तयार होतात. काही जणांनी मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय सोडून चार पैसे जास्त मिळतात म्हणून काही करण्यास तयार होतात. माणसांची ही खेप बांगला देशातूनच येते असे नाही तर म्यानमारच्या सीमावर्ती भागातून चालते. या बंदी लोकांत राेहिंग्या समाजाची माणसे असतात. ही पैशाच्या लालसेपोटी काहीही करण्यास तयार असतात. आज अनेक रोहिंग्या बांगला देशात रिक्षा चालवणे, मजुरी करणे किंवा कारखान्यात मानवी कष्टाची कामे करत आहेत. आपल्या मित्रांना किंवा नातेवाइकांनाच फूस लावणारी एक टोळी बांगला देश आणि म्यानमारच्या सीमेवर कार्यरत आहे. या टोळीतील लोकांना नवे लोक जोडण्यासाठी आधीच्या लोकांना काही रक्कम देतात. लोकांचे अपहरण करण्याच्या घटना येथे सामान्य आहेत. असे गुन्हे वाढत आहेत, याची सगळ्यांना माहिती आहे. परंतु या बातम्या गुपचूपपणे दाबून टाकण्यात येतात. मी जेव्हा महंमद हुसेन यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितले, आता डोळे उघडे ठेवून दुकान चालवण्याचीही भीती वाटू लागली आहे. ते नावात भरून आणलेल्या आणि तेथे पोहाेचणा-यालोकांशी थोडी बातचित करतात. कारण नावात सवार होण्याचे ते शेवटचे ठिकाण आहे. तेथेच त्यांचे दुकान आहे. त्यांनी सांगितले, मी अनेकदा लोकांना नावेत बसून जाऊ नका, अनेक नावा समुद्रात बुडाल्या आहेत असे सांगून पाहिले. पण लोक ऐकण्यास तयार नाहीत. परदेशात चांगले पैसे मिळतात अशी स्वप्ने दाखवली जातात. काही वस्तूंची तस्करी करण्याऐवजी आता माणसांची तस्करी केली जात आहे.
© The New York Times