आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम टप्प्यात किमोथेरपी देण्याच्या फायद्यावर प्रश्नचिन्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला किमोथेरपी आणखी एकदा घ्यायला हवी का? हा प्रश्न अंतिम घटका मोजत असलेल्या रुग्णासाठी खूप कठीण असतो. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कॅन्सरतज्ज्ञाच्या गाइडलाइनमध्ये तर असे म्हटले आहे की, जे रुग्ण अंथरुणात स्वत: काहीच हालचाल करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी किमोथेरपीचा शेवटचा डोस देण्यास मनाई आहे; परंतु थोडासा आत्मविश्वास असलेल्या रुग्णांसाठी हा तर्कसंगत पर्याय आहे.

याच्या विषारी साइड इफेक्टमुळे आयुष्याची शेवटची घटका मोजत असलेले रुग्ण व डॉक्टर रुग्णाचा त्रास कमी होईल आणि त्याचे थोडे आयुष्य वाढेल यासाठी किमोथेरपी योग्य समजतात. आता एका अभ्यासानुसार असे निदर्शनास आले आहे की, थोडी मजबूत अंगकाठी असलेल्या रुग्णांसाठीसुद्धा किमोथेरपीने काही फायदा होत नाही; परंतु ज्यांनी हा पर्याय स्वीकारण्यास नकार दिला त्या परिस्थितीत त्या रुग्णांची प्रकृती खूप खराब असू शकते. ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीचे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डाॅ. चार्ल्स डी. ब्लँक यांनी सांगितले, किमोथेरपी आयुष्य वाढवते असे मानले जाते; पण या अभ्यासानुसार तसे होत नाही.
जेएएमए ऑन्कॉलॉजीमध्ये प्रकाशित होणा-यास्टडीमध्ये अंतिम सहा महिने किंवा त्याहून कमी कालावधी उरलेल्या ३१२ वयस्कर रुग्णांचा अभ्यास केला गेला. त्यांच्या फुप्फुस, मोठे आतडे, पॅन्क्रियाज अाणि स्तनात कॅन्सरच्या गाठी होत्या. त्यातील अर्ध्या रुग्णांनी किमोथेरपीचा डोस घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या केअरटेकरनी रुग्णाचे आयुष्य सुखासमाधानाचे जाण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. ज्यांची प्रकृती खूप खराब होती त्यांच्या अवस्थेत फारसा फरक पडला नाही. मग त्यांनी किमोथेरपी घेतली काय किंवा न घेतली काय? परंतु सुरुवातीच्या काळात तुलनात्मकदृष्ट्या कॅन्सरची कमी लक्षणे असलेल्या १२२ रुग्णांच्या बाबतीत परिणाम लक्षणीय होते.

किमोथेरपी घेणा-या५६ टक्के रुग्णांची परिस्थिती किमोथेरपी न घेतलेल्या ३१ टक्के रुग्णांच्या तुलनेत खराब झाली होती. स्टडीचे प्रमुख अभ्यासक व विल कार्नेल मेडिकल कॉलेजमधील एंड आॅफ लाइफ केअर रिसर्च सेंटरच्या संचालिका हॉली प्रिगरसन यांनी सांगितले, आम्हाला तर याउलट निष्कर्ष असेल असे वाटत होते. आजारातून वाचण्यासाठी दोन्ही गटांत कसलाच फरक नव्हता. तथापि, काही तज्ज्ञ स्टडीच्या निष्कर्षांना लागू करण्याच्या विरोधात सावध करत होते. मिशिगनचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. थॉमस ग्रिबिन यांनी सावध केले की, स्टडी २००२ आणि २००८ च्या दरम्यान केली गेली. आता अपेक्षेपेक्षा कमी साइड इफेक्ट असलेली किंवा कॅन्सरच्या गाठीवर थेट आघात करणा-याकिमोथेरपीच्या औषधाचा शोध लागलेला नव्हता. आज शरीरातील कोणत्याही अंगासाठी विष न ठरणा-याअनेक औषधी आहेत. शिवाय साइड इफेक्टपासून बचाव करण्यात प्रगतीही केली आहे.
त्यांनी सांगितले, किमोथेरपीसंबंधी सल्ला अत्याधिक व्यक्तिगत दिला पाहिजे. कारण काही रुग्ण खूप जगू इच्छितात. काहींना त्रासदायक आयुष्य नको असते. तसेच त्यांना मुलीच्या लग्नासाठी ३ महिने तरी जगण्याची इच्छा असते.© The New York Times